JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय म्हणावं याला! तरुणीला हटके Propose करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट

काय म्हणावं याला! तरुणीला हटके Propose करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट

प्रपोज करायला गेला आणि तरुणाला रुग्णालयात करावं लागलं भरती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 26 नोव्हेंबर : एखादी तरुणी आवडली तर तिला इम्प्रेस करण्यासाठी तरुण धडपडत असतात. आपण तिला मागणी घालताच तिने नकार देऊच नये, अशा पद्धतीने प्रपोज (Propose) करण्याचा प्लॅन करतात. प्रेमात  वेडा झालेल्या अशाच एका तरुणाला हटके पद्धतीने प्रपोज करणं चांगलंच महागात पडलं आहे (Propose idea gone wrong). युनिक प्रपोजच्या नादात त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टची (Private part) वाट लावली आहे. ऑस्ट्रेलियातील (Australia) एका तरुणाने प्रपोजसाठी अशी क्रिएटिव्ह आयडिया (Creative propose idea) शोधली जी त्याच्यावर भारी पडली. या तरुणाच्या गर्लफ्रेंडनेच (Girlfriend) आपल्या बॉयफ्रेंडची (Boyfriend) ही संपूर्ण स्टोरी एका टीव्ही शोमध्ये सांगितली आहे, असं वृत्त  डेली स्टार ने दिलं आहे. तरुणीने सांगितल्यानुसार तरुण तिला प्रपोज करणार होता याची माहिती तिला नव्हती. त्याने त्यासाठी खास तयारी केली होती. प्रपोजच्या त्या क्षणानंतर त्यांचे रोमँटिक क्षण त्यांना रुग्णालयात घालवावे लागले. हे वाचा -  मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाहीयेत पुरुष; तरुणीच्या भूताशीही लग्न करण्याची तयारी सामान्यपणे प्रपोज करताना कोणत्याही पद्धतीने प्रपोज केलं तरी रिंग (Ring) ही असते. या तरुणानेही तरुणीसाठी अशीच रिंग खरेदी केली. पण ती रिंग देण्याची त्याची पद्धत विचित्र होती. त्याने रिंग आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली होती. गर्लफ्रेंड जशी समोर येईल तशी तो पँटची चैन उघडून प्रायव्हेट पार्टच बाहेर काढेल आणि त्यातली रिंग तिला दिसेल, असा सर्व त्याचा प्लॅन होता. पण यापैकी काहीच झालं नाही. उलट भलंतच काहीतरी घडलं, ज्याचा विचारही या तरुणाने केला नसेल. तरुणीने सांगितलं, जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने आपल्या पँटची चैन उघडली तेव्हा अंगठीसोबत त्याच्या प्रायव्हेट पार्टची त्वचाही चैनीत अडकली. त्यानंतर तो वेदनेने किंचाळू लागला. दोघांनीही चैनीत अडकलेली त्वचा काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच शक्य झालं नाही, अखेर तरुणी त्याला घेऊन रुग्णालयात गेली. तिथं डॉक्टरांनी चैन आणि प्रायव्हेट पार्टची त्वचा वेगळी केली. हे वाचा -  गर्लफ्रेंड निघाली पक्की जासूस, बेडवरच्या केसावरून लावला दुसऱ्या गर्लफ्रेंडचा शोध यानंतर या विचित्र प्रपोजमुळे तरुणीने तरुणाला चांगलंच झापलं. पूर्ण रात्र आम्ही रुग्णालयात होतो. दुसऱ्या दिवशी मी त्याला चांगलंच फटकारलं. मी माझ्या पालकांना आणि मित्रांना तू कसं प्रपोज केलं हे कसं सांगितलं असतं, असी मी त्याला विचारलं. मला एक चांगलं आनंदी आयुष्य जगायचं आहे, ज्याच माझी मुलंही असावी. पण माझ्या बॉयफ्रेंडने असा प्रताप केला तर कदाचित माझी ही इच्छा पूर्ण नाही होणार. त्याची ही आयडिया खूप वाईट होती, मला बिलकुल आवडली नाही हे मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, असं ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या