मराठी बातम्या /बातम्या /Viral /गर्लफ्रेंड निघाली पक्की जासूस, बेडवरच्या केसावरून लावला दुसऱ्या गर्लफ्रेंडचा शोध

गर्लफ्रेंड निघाली पक्की जासूस, बेडवरच्या केसावरून लावला दुसऱ्या गर्लफ्रेंडचा शोध

बॉयफ्रेंडच्या बेडवर पडलेल्या एका केसावरून त्याच्या तरुणीने दुसऱ्या (Girlfriend turns detective after finding hair of another woman on boyfrinds bed) गर्लफ्रेंडचा शोध लावला.

बॉयफ्रेंडच्या बेडवर पडलेल्या एका केसावरून त्याच्या तरुणीने दुसऱ्या (Girlfriend turns detective after finding hair of another woman on boyfrinds bed) गर्लफ्रेंडचा शोध लावला.

बॉयफ्रेंडच्या बेडवर पडलेल्या एका केसावरून त्याच्या तरुणीने दुसऱ्या (Girlfriend turns detective after finding hair of another woman on boyfrinds bed) गर्लफ्रेंडचा शोध लावला.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: बॉयफ्रेंडच्या बेडवर पडलेल्या एका केसावरून त्याच्या तरुणीने दुसऱ्या (Girlfriend turns detective after finding hair of another woman on boyfrinds bed) गर्लफ्रेंडचा शोध लावला. ही कमाल तिने केली सिक्स्थ सेन्स आणि कॉमन सेन्स (Sixth sense and common sense) यांचा वापर करत. वास्तविक, विश्वास हे कुठल्याही नात्याचं मूळ असतं. विश्वासाला जेव्हा तडा जातो, तेव्हा ते नातं डळमळीत व्हायला सुरुवात होते. आपल्या बॉयफ्रेंडसोबत डिस्टंट रिलेशनशिप असणाऱ्या एका तरुणीला काही (Doubt on boyfriend) दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडचा संशय आला आणि त्यानंतर जे काही घडलं ते धक्कादायक म्हणावं, असंच होतं.

गर्लफ्रेंडची सरप्राईज भेट

आपल्या बॉयफ्रेंडचा संशय आल्यामुळे त्याला न सांगताच ही तरुणी थेट त्याच्या रुमवर दाखल झाली. आपण येणार असल्याचा कुठलाही मेसेज किंवा फोन तिने बॉयफ्रेंडला केला नव्हता. गर्लफ्रेंड समोर पाहून आनंद होण्याऐवजी अगोदर तरुणाला धक्का बसल्याचं तरुणीला जाणवलं. मात्र कदाचित आपल्याच मनात संशय असल्यामुळे आपल्याला तसं वाटलं असेल, असा विचार तिच्या मनात आला.बेडवर दिसला केस

बॉयफ्रेंडच्या बेडवर एक सोनेरी रंगाचा केस तरुणीला दिसला. तो केस पाहून तरुणीचा संशय अधिकच वाढला. आपल्या बॉयफ्रेंडचे नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरुणीसोबत रिलेशन असावेत, याची तिला खात्रीच पटली. मात्र कुठलाच पुरावा जवळ नसल्यामुळे याबाबत बॉयफ्रेंडला तिने काहीच विचारले नाही. आपला कॉमन सेन्स वापरत याचा शोध घेण्याचा निर्णय तिने घेतला.

हे वाचा- खूशखबर! 7वी पास महिलांसाठी रोजगाराची सर्वात मोठी संधी; 'या' जिल्ह्यात भरती

असा घेतला शोध

तरुणीने फेसबुकवर बॉयफ्रेंडच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणाऱ्या सोनेरी केसांच्या मुलींची यादी तयार केली. त्यानंतर बॉयफ्रेंड राहत असलेल्या शहरात त्यापैकी किती मुली राहतात, याची यादी वेगळी केली. त्या यादीची छाननी करताना तरुणाच्या कार्यालयात काम करणारी सोनेरी केसांची एक मुलगी तिला सापडली. त्यानंतर तिने बॉयफ्रेंडच्या मोबाईलवरून तिचा नंबर शोधला आणि डिलिट केलेले काही मेसेजेस रिट्राईव्ह केले. त्या संभाषणावरून तिला बॉयफ्रेंडची ही दुसरी गर्लफ्रेंड असावी, याची खात्री पटली. मात्र तरीही खातरजमा करण्यासाठी तिने या नंबरवर गुडनाईट असा मेसेज पाठवला. त्यावर पलिकडून जो काही रिप्लाय आला, तो वाचून बेडवर पडलेला केस त्याच तरुणीचा होता, याची तिला खात्री पटली. टिकटॉकवरून आपला हा अनुभव तरुणीने शेअर केला आहे.

First published:

Tags: Boyfriend, Delhi, Girlfriend, Tik tok