मराठी बातम्या /बातम्या /Viral /हद्दच झाली! सुंदर तरुणीच्या मृत्यूनंतरही तिचा पिच्छा सोडत नाहीयेत पुरुष; तिच्या भूताशीही लग्न करण्यासाठी धडपड

हद्दच झाली! सुंदर तरुणीच्या मृत्यूनंतरही तिचा पिच्छा सोडत नाहीयेत पुरुष; तिच्या भूताशीही लग्न करण्यासाठी धडपड

मृत तरुणीच्या अस्थी चोरून तिच्या भूताशी लग्न करण्याची तयारी केली जाते आहे.

मृत तरुणीच्या अस्थी चोरून तिच्या भूताशी लग्न करण्याची तयारी केली जाते आहे.

मृत तरुणीच्या अस्थी चोरून तिच्या भूताशी लग्न करण्याची तयारी केली जाते आहे.

बीजिंग, 26 नोव्हेंबर : एखादी महिला सुंदर असेल तर किती तरी पुरुष तिच्यावर फिदा असतात. ती आपली व्हावी यासाठी धडपडत असतात. पण कोणत्या सुंदर महिलेच्या भूताशी लग्न करण्याचा कुणी स्वप्नात तरी विचार करेल काय? (Weird Traditions) आपण कल्पनाही करू शकत असं प्रत्यक्षात घडतं आहे ती चीनमध्ये (China Old Traditions). जिथं एका सुंदर तरुणीच्या मृत्यूनंतरही पुरुष तिचा पिच्छा सोडण्यास तयार नाही (Men want to marry dead woman).

एका सुंदर तरुणीच्या भूताशी लग्न करण्यासाठी पुरुषांची धडपड सुरू आहे. Luoxiaomaomaozi असं या तरुणीचं नाव. ती सोशल मीडिया स्टार होती, सौंदर्यासाठी ती खूप प्रसिद्ध होती. तिच्या सौंदर्याने खूप पुरुष घायाळ व्हाययचे टिकटॉकप्रमाणेच Douyin या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तिचे सहा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

गेल्याच महिन्यात तिने आत्महत्या केली. आत्महत्येचा लाइव्ह व्हिडीओही केला होता (Social Media Influencer Suicide livestream). मला आत्महत्या करावीशी वाटते आहे, असं म्हणत ती कीटकनाशक प्यायली. व्ह्युअर्सनेसुद्धा तिला पेस्टीसाइड पिण्यासाठी भाग पाडलं होतं. चिनी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिला वाचवता आलं नाही. 15 ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला.

हे वाचा - Shocking! म्हणे, भूत हिच्यासोबत करतो सेक्स; ऑर्गेझममुळेच मरण्याची गायिकेला भीती

मृत्यूआधी तिने आपले 38  व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर केले होते आणि ते खूपच चर्चेत होते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार तिच्या अंत्यसंस्कारानंतर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिच्या अस्थी विकण्याची योजना आखली. ज्यामुळे लोक तिच्या मृत्यूनंतर तिच्या भूतासोबत लग्न (Ghost Marriage) करू शकतील.

मलय मेलच्या रिपोर्टनुसार चिनी संस्कृत घोस्ट मॅरेज ही 3000 वर्षे जुनी प्रथा आहे, जी काही भागात आजही पाळली जाते. यामध्ये जिवंत लोक मृत व्यक्तीसोबत लग्न करतात. मृत्यू व्यक्तीचंही लग्न व्हावं आणि त्यासोबत लग्न करणारी जिवंत व्यक्ती मृत झाल्यानंतर ते दोघंही मृत्यूनंतर एकत्रित आनंदीत आयुष्य जगतील.

हे वाचा - एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपी म्हणजे काय? महिला का करत आहेत याचा जास्त वापर

ही प्रथा चीनमध्ये अनेक वर्षांपूर्वी बंद झाली होती पण आता जेव्हा लोक ऑनलाईन मृत होणाऱ्यांसोबत मॅचमेकिंग करू लागले पुन्हा समोर येऊ लागली आहे. माहितीनुसार महिलेचं अंत्यसंस्कार करणारी व्यक्तीसह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: China, Culture and tradition, Viral, World news