कोल्हापूर, 02 नोव्हेंबर: कोल्हापूर (Kolhapur) शहरातील देवकर पाणंद परिसरातील मोहिते मळा येथे एका अनोळखी महिलेचा महिलेचा खून (Unknown woman murder) करून तिचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला (Dead body found) आहे. मारेकऱ्यांनी महिलेचा खून करून तिच्या मृतदेह एका पोत्यात भरून चारचाकीने याठिकाणी आणून टाकल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी महापालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्यासाठी आले असता, त्यांना हा मृतदेह आढळून आला. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्वरित या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संबंधित मृत महिलेचं वय अंदाजे 30 ते 40 च्या दरम्यान असावं आणि 5 ते 6 दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाली असावी. तसेच मृत महिलेच्या अंगावरील गाऊन आणि एकंदरीत महिलेची झालेली अवस्था पाहाता हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हेही वाचा- पत्नीनं जगणं केलं मुश्कील; छळाला कंटाळून पुण्यातील तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल पीडित महिला नेमकी कोण? आणि तिची हत्या कोणी केली? याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ज्याठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला आहे, त्याठिकाणी विरळ लोकवस्ती असली तरी सायंकाळनंतर हा परिसर निर्जन असतो. त्यामुळे महिलेची ओळख पटवणं आणि मारेकऱ्यांना शोधून काढणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान बनलं आहे. महिलेची उंची सव्वा पाच फुट, पायात काळा जाड दोरा, अंगात गाऊन अशा वर्णनावरून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हेही वाचा- पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3महिने विकृत कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन् अज्ञात मारेकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास हा मृतदेह चारचाकी वाहनातून आणून याठिकाणी टाकला असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील विविध इमारतीबाहेरी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. तसेच दरम्यानच्या चार-पाच दिवसात घटनास्थळावरील फोन कॉलचे डिटेल देखील पोलिसांकडून तपासले जात आहेत. या घटनेचा पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.