मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पत्नीनं जगणं केलं मुश्कील; त्रासाला कंटाळून पुण्यातील तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

पत्नीनं जगणं केलं मुश्कील; त्रासाला कंटाळून पुण्यातील तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

Suicide in Pune: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका तरुणाने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

Suicide in Pune: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका तरुणाने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

Suicide in Pune: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका तरुणाने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

पुणे, 01 नोव्हेंबर: पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका 33 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने खोट्या तक्रारी करत नातेवाईकांमध्ये आणि कंपनीत बदनाम केल्याने (wife tortured husband) नैराश्यात गेलेल्या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तरुणाने 29 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या (Husband commits suicide by drinking poison) केली आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या भावाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. वारजे पोलिसांनी 28 वर्षीय महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश संभाजी चौघुले असं आत्महत्या करणाऱ्या 33 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यातील वारजे परिसरातील रहिवासी आहे. तर स्नेहल प्रकाश चौघुले असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पत्नीचं नाव आहे. फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पत्नी स्नेहल हिने मृत पती प्रकाश यांच्याविषयी खोट्या तक्रारी करत नातेवाईक आणि कंपनीमध्ये बदनामी केली होती. गेल्या काही काळापासून पत्नी सातत्याने प्रकाशला त्रास देत होता.

हेही वाचा- प्रेमात आड येणाऱ्या पतीला संपवण्यासाठी रचला खुनी खेळ; चॅटींगमधून फुटलं बिंग, माहेरचीही होती साथ

पत्नीच्या सततच्या त्रासामुळे प्रकाशला मानसिक स्थिती बिघडली होती. आरोपी पत्नीने सतत अपमानित करून प्रकाश याचं जगणं मुश्कील केलं होतं. त्यामुळे पीडित पती प्रकाश याने 29 सप्टेंबर रोजी विष प्राशन केलं होतं. प्रकाश यांनी विष प्राशन केल्याची माहिती समजताच त्यांना पिरंगुट येथील मुळशी स्पेशालिस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान प्रकाश यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3 महिने घृणास्पद कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन्...

यानंतर, आता मृत प्रकाश चौघुले यांचा भाऊ गीरीष संभाजी चौघुले याने वारजे पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Husband suicide, Pune