पुणे, 01 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. अलीकडेच पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. महाराष्ट्राला हादरून सोडणारी ही घटना ताजी असताना, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune) वानवडी परिसरात एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor girl raped by teacher) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नराधम आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पीडितेच्या आई वडिलांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात जात 52 वर्षीय नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. वानवडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला बेड्या (Accused teacher arrested) ठोकल्या आहेत.
हेही वाचा-5 रुपयांचं नाणं देऊन 5 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; 65 वर्षीय अटकेत
संजय रमेश शर्मा असं अटक केलेल्या 52 वर्षीय शिक्षकाचं नाव असून तो पुण्यातील वानवडी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी शिक्षक खासगी शिकवणी घेतो. तर 15 वर्षीय पीडित मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी येत होती. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी आरोपी शिक्षक पीडितेला इमारतीच्या छतावर (minor girl rape on terrace) घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला आहे.
हेही वाचा- प्रेमात आड येणाऱ्या पतीला संपवण्यासाठी रचला खुनी खेळ; चॅटींगमधून फुटलं बिंग, माहेरचीही होती साथ
घाबरलेल्या पीडित मुलीने घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. यामुळे आरोपी शिक्षकाची देखील हिंमत वाढली. 3 ऑगस्ट रोजीच्या घटनेनंतरही आरोपीनं पीडितेला अनेकदा छतावर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे. 3 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबरपर्यंत जवळपास तीन महिने आरोपी शिक्षक पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी शिक्षकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Rape on minor