पोटच्या मुलीची हत्या करणारा नराधम बाप... (फोटो-लोकमत)
कुरंदवाड, 18 ऑगस्ट: दोन दिवसांपूर्वी चिकोडी तालुक्यातील कल्लोळ याठिकाणी दूधगंगा नदीपात्रात (Dudhganga river) एका 17 वर्षीय विवाहित तरुणीचा (Married Woman) मृतदेह (Dead Body Found) आढळला होता. संबंधित मुलीनं सासरी नांदायला नकार दिल्यानं बापानेचं तिला नदीत ढकलून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलाला ताब्यात घेत चौकशी केली असता, बापानं धक्कादायक कबुली दिली आहे. वागण्यात बदल होत नसल्यानंच आपण आपल्या मुलीला नदीत ढकलून तिची हत्या केल्याची कबुली मृत साक्षी काटकरचे वडील दशरथ काटकर यानं दिली आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी बापाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. शनिवारी संशयित आरोपी दशरथने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असताना, हत्येचं गूढ उलगडलं आहे. हेही वाचा- बदली रद्द करण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; घरी बोलवून वरिष्ठाचे अश्लील चाळे नेमकं काय घडलं? मृत मुलगी साक्षी दशरथ काटकर (वय-17) हिचा तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी बालविवाह लावून दिला होता. पण काही दिवसांतच साक्षीनं सासरी नांदायला नकार दिला. याच रागातून बापानं आपल्या मुलीचा काटा काढला आहे. मृत साक्षी ही शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथून चार दिवसांपासून बेपत्ता होती. यानंतर चौथ्या दिवशी चिकोडी तालुक्यातील कल्लोळ याठिकाणी दूधगंगा नदीपात्रात तिचा मृतदेह आढळला होता. तत्पूर्वी वडिलानेच शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. हेही वाचा- अन् स्वतःच्या हातानं कपडे काढत पूजेत नग्नावस्थेत बसवलं; अत्याचारानं नाशिक हादरलं पण पोलिसांना संशय आल्यानं नराधम बापाच बिंग फुटलं आहे. फिर्यादी बापाला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलीनं सासरी नांदायला नकार दिल्यानं आपण पोटच्या लेकीला नदीत ढकलून दिल्याचं आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.