जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / ..अन् स्वतःच्या हातानं कपडे काढत पूजेत नग्नावस्थेत बसवलं; तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनं नाशिक हादरलं

..अन् स्वतःच्या हातानं कपडे काढत पूजेत नग्नावस्थेत बसवलं; तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनं नाशिक हादरलं

..अन् स्वतःच्या हातानं कपडे काढत पूजेत नग्नावस्थेत बसवलं; तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनं नाशिक हादरलं

Crime in Nashik: अत्याचाराची परिसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. येथील एका भोंदूबाबानं बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार (Married woman rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 18 ऑगस्ट: अत्याचाराची परिसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना नाशकात घडली आहे. येथील एका भोंदूबाबानं बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार (Married woman rape)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदूबाबानं पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं (lure of money rain) पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून (sat naked in worship) तिच्यावर अत्याचार (Rape in Nashik) केला आहे. हा अघोरी आणि अमानुष प्रकार समोर येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत. कामील हुलाम यासीन शेख असं संशयित 29 वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे. हा भोंदूबाबा परप्रांतिय असून गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील पत्र्याच्या खोलीत राहतो. आरोपी भोंदूबाबा कामीलनं आपले दोन साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ या दोन साथीदारांच्या मदतीनं पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपीनं पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत मागील सहा ते  सात महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार केला आहे. हेही वाचा- घरात सुख शांतीसाठी ठेवली पूजा, भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवून गायिकेवर केला बलात्कार नेमकं काय घडलं? आरोपी साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ हे पीडित महिलेच्या पतीचे ओळखीचे आहेत. या दोघांनीच पीडित महिलेशी संपर्क साधत पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर पीडित महिलाही आरोपींच्या जाळ्यात अडकली. पैशांच्या लोभापोटी आरोपींनी सांगितलेले सर्व आघोरी कृत करायला सुरुवात केली. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर पूजेत नग्नावस्थेत बसावं लागेल अशी अट संशयित आरोपींनी पीडित महिलेला घातली होती. हेही वाचा- मुंबईतील उच्चशिक्षित तरुणी बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकली; लोकलमधील जाहिरात पाहून साधला संपर्क अन्… यानंतर आरोपी भोंदूबाबानं  स्वत: आपल्या हातानं पीडित महिलेचं कपडे काढत तिला नग्नावस्थेत पूजेला बसवलं. यानंतर आरोपी भोंदबाबानं पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. हा अघोरी प्रकार मागील सहा ते सात महिन्यांपासून सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेनं संबंधित आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित दोन साथीदारांनी भोंदूबाबाला अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपी पीडितेनं केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात