नाशिक, 17 ऑगस्ट: बदली रद्द करण्यासाठी (For Cancel Transfer) एका महिला तलाठ्याकडे तिच्या वरिष्ठाकडून शरीरसुखाची मागणी (Senior Officer Demand Sexual Relation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नियम डावलून बदली केल्याप्रकरणी संबंधित महिला तलाठी प्रांताधिकाऱ्याकडे आपली कैफियत मांडायला गेली होती. दरम्यान आरोपी प्रांताधिकाऱ्यानं बदली रद्द करण्यासाठी तलाठी महिलेकडं शरीरसुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं मॅटकडे तक्रार केली असून या बदलीला त्वरित स्थगिती देण्यात आली आहे. संबंधित घटना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आहे. येथील एका महिला तलाठी महिलेची बदली करण्यात आली होती. अचानक नियम डावलून बदली केल्याप्रकरणी संबंधित तलाठी महिला प्रांताधिकाऱ्याकडे दाद मागायला गेली होती. पण आरोपी प्रांताधिकाऱ्यानं पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. आरोपीनं पीडित महिलेला घरी बोलवून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा- Pune: लग्नाला नकार दिल्यानं तरुणीचं घृणास्पद कृत्य; प्रियकराला लॉजवर बोलवलं अन्. इतकेच नव्हे तर आरोपीनं ‘अजूनही बदली रद्द होऊ शकते’, असा निरोप अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून पीडितेकडं पाठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. तसेच पीडित तलाठी महिलेनं विविध आरोप केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होताच महसूल विभागात खळबळ उडाली आहे. पण येवला उपविभागीय अधिकाऱ्यानं सर्व आरोपांचं खंडण केलं असून सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा- मामीसोबत तरुणाचे अवैध संबंध; या Love Story चा मामाने असा केला शेवट दुसरीकडे, आणखी एका महिला तलाठ्यानं येवला उभविभागीय अधिकाऱ्यानं लाच मागितल्याचा आरोप केला आहे. आरोपी अधिकाऱ्यानं आपल्याकडे 60 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. या दोन घटनेमुळे येवला महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.