JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Thalaivi साठी ‘फिट’ कंगनाने वाढवलं 20 किलो वजन’; पाहा अभिनेत्रीच्या ट्रांसफॉर्मेशनची झलक

Thalaivi साठी ‘फिट’ कंगनाने वाढवलं 20 किलो वजन’; पाहा अभिनेत्रीच्या ट्रांसफॉर्मेशनची झलक

Thalaivi film trailer: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यावर्षी अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (CM Jaylalithaa) यांच्या जीवनावर अधारित चित्रपटाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मार्च : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यावर्षी अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (CM Jaylalithaa) यांच्या जीवनावर अधारित चित्रपटाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. थलायवी चित्रपटाचा ट्रेलर (Thalaivi Film Trailer) 23 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. उद्या कंगनाचा वाढदिवस (Kangana Ranaut Birthday) असून तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चेन्नई आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer Release Date) एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या आदल्या दिवशीच, कंगनानं जयललितांची तीन वेगवेगळी पात्रं दर्शवणारे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जयललितांच्या प्रत्येक व्यक्तीरेखेला कंगनानं पुरेपुर न्याय दिला आहे. अशा फोटोंमध्ये कंगनाचं शारीरिक परिवर्तन खरोखरच कौतुकास्पद आहे. हे फोटोज ट्विटरवर शेअर करताना कंगना म्हणाली की, “जयललिता यांची थोरगाथा लवकरच सर्व चाहत्यांना पाहायला मिळेल, यासाठी मला खूप आनंद होत आहे.” थलायवीच्या या पात्रांसाठी 20 किलो वजन वाढवून नंतर काही महिन्यांत तेवढंच वजन कमी करणं मोठं आव्हान होतं." कंगनाने एका फोटोत बालपणीच्या जयललिता साकारल्या आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत ती भरतनाट्यम करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत तामिळनाडू राज्यावर आपली जादू दाखवणाऱ्या मुख्यमंत्री जयललिता यांची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. प्रत्येक फोटोंतून कंगना दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललितांच्या आठवणी ताज्या करताना दिसत आहे. शिवाय जयललितांचं पात्र साकारण्यासाठी कंगनानं घेतलेली मेहनतही स्पष्ट दिसत आहे. (वाचा- अमिताभ यांनी अजून का घेतली नाही कोरोनाची लस? म्हणाले, ‘एक वेगळीच भीती..’ ) थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या