Home /News /entertainment /

अमिताभ यांनी अजून का घेतली नाही कोरोनाची लस? म्हणाले, 'एक वेगळीच भीती..'

अमिताभ यांनी अजून का घेतली नाही कोरोनाची लस? म्हणाले, 'एक वेगळीच भीती..'

उदा. जर एक कोटी रक्कम जिंकली, तर त्यातील 70 लाख रुपये स्पर्धकाला मिळतात. (फाइल फोटो)

उदा. जर एक कोटी रक्कम जिंकली, तर त्यातील 70 लाख रुपये स्पर्धकाला मिळतात. (फाइल फोटो)

78 वर्षाच्या अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी अजूनही कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेली नाही. अमिताभ यांनी अजूनही लस का घेतली नसावी? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत होता.

    मुंबई 22 मार्च : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा वेगवेगळी माहिती देत असतात. अशात आता साठ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस (Corona Vaccine) देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, 78 वर्षाच्या अमिताभ यांनी अजूनही कोरोनाची लस घेतलेली नाही. अमिताभ यांनी अजूनही लस का घेतली नसावी? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत होता. अशात अमिताभ यांनी आता स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अमिताभ यांनी का नाही घेतली कोरोनाची लस - काही दिवसांपूर्वीच एक ब्लॉग शेअर करत अमिताभ यांनी म्हटलं होतं, की व्हायसरच्या आणखी एका प्रकाराची भीती वाटत आहे. लवकरच मलाही लस घ्यावी लागेल. जेव्हा माझे डोळे बरे होतील. तोपर्यंत जग वेगळंच आहे. अनेक कलाकारांनी घेतली लस - आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोनाची लस घेतली आहे. यात शर्मिला टागोर, धर्मेंद्र, जितेंद्र, परेश रावल, सतीश शाह, राकेश रोशन आणि जॉनी लिवर यासारखी अनेक नावं आहेत. दाक्षिणात्य कलाकारांमध्ये कमल हासन, नागार्जुन आणि मोहन लाल यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्सद्वारे प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या एफआयएएफ पुरस्कारानं (FIAF Award 2021) सन्मानित करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन एफआयएएफ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, अमिताभ बच्चन लवकरच इमरान हाश्मीसोबत चेहरे सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमात रिया चक्रवर्तीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय ब्रह्मास्त्र सिनेमातही अमिताभ झळकणार आहेत. यात त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कलाकारही असणार
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Corona vaccination, Corona vaccine, Entertainment, Health, Side effects, Wellness

    पुढील बातम्या