JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची उडणार झोप, NCB कडे तब्बल 45 फोन, अनेक नावं समोर येण्याची शक्यता

ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची उडणार झोप, NCB कडे तब्बल 45 फोन, अनेक नावं समोर येण्याची शक्यता

45 फोनपैकी 15 मोबाइल फोनची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा रिपोर्ट हा NCB ला मिळाला आहे. या आधारे आता NCB तपास करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून (NCB) चौकशीचे सत्र सुरूच आहे. या प्रकरणी आता NCB च्या ताब्यात तब्बल 45 फोन हाती लागले आहे. या फोनमध्ये अनेक सेलिब्रिटींची नाव असल्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना ड्रग्स घेत असल्याचा खुलासा झाला. त्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर  अंमली विरोधी पथकाने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली आहे. PCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा अमली विरोधी पथकाने आतापर्यंत 45 फोन ताब्यात घेतले आहे. या फोनची तपासणी सध्या सुरू आहे. या फोन्समुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांची मोठी यादी समोर येण्याची शक्यता आहे. 45 फोनपैकी 15 मोबाइल फोनची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा रिपोर्ट हा NCB ला मिळाला आहे. या आधारे आता NCB तपास करत आहे. उर्वरीत 30 मोबाइल फोनची तपासणी सुरू आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे  सारा अली खान, श्रद्धा, दीपिका, करिश्मा,जया शहा यांच्या मोबाइलचे रिपोर्ट हे महत्त्वाचे ठरणार आहे. बँकांनी RBI ची केली फसवणूक; नोटाबंदीनंतर 1 कोटींच्या बनावटी नोटा केल्या जमा दरम्यान, आतापर्यंतच्या सर्व जणांचे जबाब घेण्यात आले आहे. यासोबतचं सर्व ड्रग्स पॅडलर्सचा जबाबही रिव्ह्यू करण्यात येईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यू केल्यानंतर येणाऱ्या निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. यामध्ये कॉल डिटेल्स, एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅट यासर्वांचा तपास केला जाईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल. हे सर्व इतकं सोपं नाही. यामध्ये अधिक काळ लागू शकतो. सोबतच यादरम्यान, जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या