Home /News /money /

बँकांनी RBI ची केली फसवणूक; नोटाबंदीनंतर 1 कोटींच्या बनावटी नोटा केल्या जमा

बँकांनी RBI ची केली फसवणूक; नोटाबंदीनंतर 1 कोटींच्या बनावटी नोटा केल्या जमा

नोटाबंदीनंतर बँकांनी जुन्या नोटांऐवजी बनावटी नोटा जमा केल्या.

    लखनऊ, 29 सप्टेंबर : वर्ष 2016 मध्ये नोटबंदी (Demonetization) नंतर विविध बँकांनी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची  (Reserve Bank of India) फसवणूक केली आहे. लखनऊ महानगरच्या आरबीआयच्या करेन्सी टेस्टमध्ये विविध बँकांनी तब्बल 1 कोटींच्या बनावटी नोटा (Fake Currency) जमा केल्या आहेत. विविध बँकांनी 2017-2018 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करीत असताना ही अफरातफर केली आहे. आरबीआयच्या करेन्सी टेस्टमध्ये 500 रुपयांच्या 9753 नोटा आणि 1000 रुपयांच्या 5783 नोटा बनावटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरबीआयकडून महानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे ही वाचा-बँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना सहायक प्रबंधक रंजना मरावी यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2017 ते मार्च 2018 दरम्.ान करेन्सी टेस्टमध्ये 15436 बनावटी नोटा जमा झाल्या आहेत. तपासणीदरम्यान 500 च्या 9753 आणि एक हजार रुपयांच्या 5783 बनावटी नोटा मिळाल्या आहेत. मिळालेल्या एकूण नोटा 1 कोटी रुपये 5 लाखांजवळ आहेत. या प्रकरणात सहायक प्रबंधकाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोबतच महानगर पोलिसांनी बनावटी नोटा फाॅरेन्सिक तपास करण्यासाठी सांगितल्या आहेत. इन्स्पेक्टर यशकांत सिंह यांनी सांगितलं की, रंजना मारवी यांच्या तक्रारीनंतर भारतीय मुद्राच्या कायद्यानुसार तक्रार दाखल करीत तपास सुरू करण्यात आला आहे. हे ही वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर बँंकेत जमा करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर बँकांनी सर्व जुन्या नोटा आरबीआयमध्ये जमा केल्या होत्या. देशातील बनावटी नोटा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली होती. मात्र बँकांनी जुन्या नोटांऐवजी बनावटी नोटा जमा केल्या.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या