मुंबई, 10 फेब्रुवारी : बॉलिवूडचा दबंग सलमान खान (salman khan) आपल्या अभिनयासोबतच अभिनेत्रींसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असतो. आजवर संगीता बिजलानी, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेली सोमी अली (Somy Ali) आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिनं सलमानसोबत्या आपल्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सोमी ही सलमानची प्रचंड मोठी चाहती आहे. नुकतंच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं सलमानबाबत आश्चर्यचकित करणारा खुलासा केला. वयाच्या सोळाव्या वर्षी फक्त सलमानसोबत लग्न करण्यासाठी ती पाकिस्तानातून भारतात आली होती (somy ali wanted to marry salman). सोमी म्हणाली, “1991 साली मी सलमानचा मैने प्यार किया हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहून मी सलमानची फॅन झाले. त्याला भेटता यावं, त्याच्याशी बोलता यावं अन् जमल्यास लग्न देखील करावं अशी इच्छा मनात बाळगून मी वयाच्या 16 व्या वर्षी भारतात आले” “सुदैवानं मी सलमानला भेटले अन् त्याच्यासोबत काम देखील करण्याची संधी मिळाली. खरं तर मला अभिनयात बिलकुल रस नव्हता. केवळ योगायोगाने मी अभिनय क्षेत्रात आले. माझं स्वप्न केवळ सलमानशी मैत्री करणं होतं अन् ते पूर्ण झालं”, असं ती म्हणाली. हे वाचा - सलमान खानच्या काळवीट शिकार खटल्याला आता नवं वळण, अंतिम सुनावणी उद्याच सोमी अली ही 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं ‘बुलंद’, ‘अंत’, ‘यारा गद्दार’, ‘आओ प्यार करे’, ‘माफिया’, ‘चुप’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिच्या चित्रपटांना फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय तिला देखील अभिनयात फारसा रस नव्हता. परिणामी काही वर्षातच तिने चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. हे वाचा - एकता कपूरनं लग्न केलं? कधी? रुग्णालयातला ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल दरम्यान तिची सलमानसोबत खूप चांगली मैत्री झाली. अन् आज पुन्हा एकदा ती सलमानसोबतच्या खास मैत्रीमुळे चर्चेत आहे.