मुंबई, 10 फेब्रुवारी : बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर (Ekta Kapoor) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. अलिकडेच एकतानं आपली खास मैत्रीण अभिनेत्री अंकिता हसनंदानीसोबतचा (Anita Hassanandani) एक व्हिडीओ शेअर केला. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकरी कोड्यात पडले आहेत. एकतानं लग्न केलं की काय? असा सवाल तिला वारंवार केला जात आहे. (Ekta Kapoor Viral Video) असं काय आहे या व्हिडीओमध्ये? एकता अंकिताला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी तिने आपल्या खास मैत्रीणीसोबत भरपूर गप्पा मारल्या. दरम्यान तिने अंकितासोबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला. मात्र हा व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. कारण एकतानं आपल्या कपाळावर कुंकू (सिंदूर) लावलेलं दिसत आहे.
पाहा - अनिता हसनंदानीच्या घरी आला चिमुकला पाहुणा; डिलीव्हरीनंतरचा पहिला VIDEOमांग मे सिंदूर लावलेली एकता अशी पहिल्यांदाच दिसली. ती अद्याप सिंगल आहे. मग तिने सिंदूर का लावला? तिने लॉकडाउंनमध्ये गुपचूप लग्न केलं की काय? अशा शंका आता नेटकरी घेऊ लागले आहेत. एकताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एकताच्या ‘मांग मे सिंदूर’ वर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अनिता झाली आई अकितानं काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. तिचा पती रोहित रेड्डी याने आपल्या बाळाचा फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अखेर कंगना रणौत Twitter ला करणार रामराम! आता या प्लॅटफॉर्मवर मांडणार मतं अनिता अद्याप रुग्णालयातच आहे. त्यामुळे मैत्रीणीला व तिच्या बाळाला पाहण्यासाठी एकता थेट रुग्णालयात आली. मात्र सध्या अंकिता व तिच्या बाळाऐवजी एकताच कपाळावरील कुंकूमुळं अधिक चर्चेत आहे.