मुंबई, 10 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर (Bollywood actor Salman Khan) गेल्या अनेक वर्षांपासून एक खटला (case) सुरू आहे. तो म्हणजे, त्यानं केलेल्या हरणाच्या बेकायदेशीर शिकारीचा (Black buck killing) आता या खटल्यात एक नवाच ट्विस्ट (new twist)आला आहे. सलमाननं या प्रकरणात खोटं शपथपत्र (false affidavit) दाखल केल्याबाबत माफी मागितली आहे. मंगळवारी त्यानं ही माफी मागितली. त्यानं हे सगळं चुकून झाल्याची कबुली दिली आहे. हे शपथपत्र त्यानं 18 वर्षांपूर्वी 2003 साली जोधपूर सेशन कोर्टापुढे (Jodhpur Session Court) सादर केलं होतं. या प्रकरणावर 1998 पासून सुनावणी सुरू आहे. गुरुवारी 11 फेब्रुवारीला या प्रकरणात अंतिम निकाल दिला जाणार आहे. सलमानवर त्यानं शूटिंगदरम्यान (shooting) काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे. हेही वाचा - बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात कंगनाची माघार; परवानगीसाठी आता BMC ला साकडं या केसची सुनावणी मागच्या दोन दशकांपासून सुरू आहे. आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलं आहे. Times Of India नं दिलेल्या वृत्ता नुसार, सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत (Advocate Hastimal Sarswat) यांनी म्हटलं आहे, की 8 ऑगस्ट 2003 मध्ये न्यायालयात चुकून खोटं शपथपत्र दिलं गेलं होतं. याशिवाय सलमान बिझी असल्यानं त्यांचं लायसन्स (license) रिन्यू व्हायला गेलं आहे हे विसरला होता. आणि त्यानं कोर्टात म्हटलं होतं, की त्याचं लायसन्स सापडत नाही.’ यासोबतच सलमानच्या वकिलानं अपील केली आहे, की ‘यासाठी सलमानला माफ केलं गेलं पाहिजे.’ सलमानवर आरोप आहे, की त्यानं ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान एका गावात काळ्या हरिनाची शिकार केली होती. यामुळं आर्म ऍक्टखाली त्याच्यावर केस झाली होती. कोर्टानं त्याला आपलं आर्म लायसन्स सुपूर्द करायला सांगितलं होतं. त्यादरम्यान सलमाननं कोर्टात शपथपत्र देत सांगितलं होतं, की माझं लायसन्स हरवलं आहे. याप्रकरणात बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.