मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘अटॅक’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. नावाप्रमाणेच हा जबरदस्त अक्शननं भरलेला एक थ्रिलरपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक स्टंट शूट करत असताना जॉन जखमी झाला आहे. हा स्टंट करताना त्याच्या चेहऱ्यावर काच फुटली अन् रक्त वाहू लागलं. या लक्षवेधी स्टंटचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकित व्हाल. जॉन एक फाईटिंग सिक्वेंस शूट करत होता. यावेळी एक गुंड जॉनच्या अंगावर ट्यूबलाईल फोडतो असा सीन शूट केला जाणार होता. परंतु हा सीन शूट करत असताना सहकलाकाराचा तोल गेला अन् ती ट्यूबलाईट जॉनच्या मानेवर फुटली. यातील काही काचा जॉनच्या चेहऱ्यावर देखील उडाल्या आणि रक्त वाहू लागलं. रक्त पाहून दिग्दर्शकानं त्वरित चित्रीकरण थांबवण्याचा इशारा दिला.
जॉनने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केला आहे. “हे जे काही चाललं आहे ते मला खूप आवडतय” अशा आशयाची कॉमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे. अभिनेता टायगर श्रॉफनं देखील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याने अक्शन मॅन म्हणत स्टंट पूर्ण करण्यासाठी जॉनला प्रोत्साहन दिलं आहे. अवश्य पाहा - कंगना झाली होती किडनॅप; अभिनेत्रीच्या आत्मनिर्भर स्ट्रगलची उडवली जातेय खिल्ली
यापूर्वी देखील जॉनचा बाईक स्टंट करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर देखील लाखो चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. अटॅक हा एक अक्शनसीननं भरलेला एक थ्रिलरपट आहे. या चित्रपटात राकूल प्रित सिंह आणि जॅकलिन फर्नांडिस देखील झळकणार आहेत.