कंगना झाली होती किडनॅप; अभिनेत्रीच्या आत्मनिर्भर स्ट्रगलची उडवली जातेय खिल्ली

कंगना झाली होती किडनॅप; अभिनेत्रीच्या आत्मनिर्भर स्ट्रगलची उडवली जातेय खिल्ली

अंडरवर्ल्ड माफियानं कंगना रणौतला केलं होतं किडनॅप; अभिनेत्रीचा किस्सा ऐकून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडी यावर ती आपल्या रोखठोक प्रतिक्रिया देते. परंतु सतत व्यक्त होण्याच्या या प्रवृत्तीमुळं तिला अनेकदा ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी कंगनानं आपल्या बालपणीचा किस्सा सांगितला. वडिलांनी 15 व्या तिला घराबाहेर काढलं होतं. मात्र हा किस्सा ऐकून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाली कंगना?

“मी वयाच्या 15 व्या वर्षी घरं सोडलं होतं. वडिलांनी मला मदत करायला देखील नकार दिला होता. तेव्हापासून मी आत्मनिर्भर आयुष्य जगले आहे. 16 व्या वर्षी एका अंडरवर्ल्ड माफियानं मला पकडलं होतं. पण 21 वर्षी मी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून उदयास आले होते. मला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. वांद्रे येथील एका उच्चभ्रू वस्तीत मी माझं घर विकत घेतलं होतं.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

अवश्य पाहा - अभिनेत्रीच्या मुर्तीवर दुधाचा अभिषेक; चाहत्यांनी केली मंदिराची स्थापना

काय म्हणतायेत नेटकरी?

कंगना तू अर्धवट माहिती देत आहेस. तू नक्कीच काही तरी मोठ्या चूका केल्या असणार त्यामुळे वडिलांनी तुला मदत करण्यास नकार दिला. कुठलेही पालक आपल्या मुलांना असं वाऱ्यावर सोडून देत नाहीत. अशा आशयाचे ट्विट्स करुन नेटकरी कंगनाची खिल्ली उडवत आहेत.

कंगनाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी कंगनाची स्तुती केली तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 16, 2021, 12:55 PM IST

ताज्या बातम्या