JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री तापसी पन्नूच्या अडचणी वाढल्या, 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्ट आयकर विभागाच्या हाती

अभिनेत्री तापसी पन्नूच्या अडचणी वाढल्या, 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्ट आयकर विभागाच्या हाती

Income Tax Raid: इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमध्ये काही बॉलिवूडकर निशाण्यावर आहेत. यामध्ये तापसी पन्नू (Tapasee Pannu) या अभिनेत्रीचं नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.

जाहिरात

Taapasee Pannu

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मार्च: अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasee Pannu) मागील अडचणी आणखी वाढू लागल्या आहेत. येणाऱ्या काळात काही कठोर कारवाईला तिला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून (Income Tax Department) मुंबई-पुण्याबरोबरच दिल्ली हैदराबाद याठिकाणी दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap), अभिनेत्री तापसी पन्नू, विकास बहलसह (Vikas Bahl), विक्रमादित्य मोटवाने (Vikramaditya Motwane) आणि मधू वर्मा मंटेना (Madhu Varma Mantena) यांच्यासह इतर व्यक्तींच्या घर व कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले होते. या छाप्यात धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या हाती लागली आहे. जवळपास 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने गेल्या दोन दिवसात छापेमारी केली. आयकर विभागाकडून फँटम, मोशन पिक्चर्स प्रोडक्शन हाऊसच्या संदर्भात छापेमारी करण्यात आलेली आहे. या कंपन्यांकडून 300 कोटी रुपयांच्या व्यवहाराबद्दल कुठलेही समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही, असे आयकर विभागाकडून सांगण्यात आलेला आहे. तापसी पन्नूकडून पाच कोटी रुपयांची कॅश रिसिप्ट आयकर विभागाला मिळाली असून यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केलेले आहे. (हे वाचा- फाटक्या जीन्सवर टीका केल्यानंतर कंगना रणौतला नेटकऱ्यांनीच दाखवला आरसा ) अनुराग कश्यप, मधू वर्मा अँटेना आणि विकास बहल यांच्यावर आयकरात चोरी केल्याचा आरोप केला होता. आयकर विभागाने यांच्या केलेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत 20 कोटी रुपयांच्या कराविषयी आयकर विभाग तपास करत आहे. आयकर विभागाकडून 2 टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर देखील छापा मारण्यात आला होता. या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ईमेल, व्हाट्सअ‌ॅप चॅट आणि हार्ड डिस्कच्या माध्यमातून हा डेटा मिळाल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. या बरोबरच आयकर विभागाला सात बँक लॉकर मिळाले असून अजूनही तब्बल 28 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं आयकर विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. आयकर विभागाने मुंबईत फँटम फिल्मच्या जोगेश्वरी येथील कार्यालयावर देखील छापा टाकला होता. दिग्दर्शक अनुराग कश्यप राहत असलेल्या ओशिवरा परिसरातील इमारतीवर आणि अभिनेत्री तापसी पन्नू राहत असलेल्या गोरेगाव परिसरातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. (हे वाचा- अनुराग-तापसी प्रकरण : तब्बल 650 कोटींची हेराफेरी; IT ला सापडला मोठा पुरावा ) 2011 मध्ये अनुराग कश्यप मधु वर्मा मंटेना, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहल या चौघांनी मिळून फँटम फिल्मची स्थापना केली होती. मात्र ऑक्टोबर 2018 मध्ये ही फिल्म कंपनी बंद करण्यात आली होती. अनुराग कश्यप हा त्याच्या सोशल माध्यमांवर केंद्र सरकारच्या कारभारावर नेहमीच टीका करत आलेला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनामध्ये तिच्या सोशल माध्यमांवर शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या