मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अनुराग-तापसी प्रकरण : तब्बल 650 कोटींची हेराफेरी; INCOME TAX ला सापडला मोठा पुरावा

अनुराग-तापसी प्रकरण : तब्बल 650 कोटींची हेराफेरी; INCOME TAX ला सापडला मोठा पुरावा

3 मार्चला IT विभागाने (income tax department) अनुराग कश्यप (anurag kashyap) आणि तापसी पन्नू (taapsee pannu) यांच्या घरावर आणि कंपनीवर धाड टाकली.

3 मार्चला IT विभागाने (income tax department) अनुराग कश्यप (anurag kashyap) आणि तापसी पन्नू (taapsee pannu) यांच्या घरावर आणि कंपनीवर धाड टाकली.

3 मार्चला IT विभागाने (income tax department) अनुराग कश्यप (anurag kashyap) आणि तापसी पन्नू (taapsee pannu) यांच्या घरावर आणि कंपनीवर धाड टाकली.

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 04 मार्च :  इन्कम टॅक्सच्या (Income Tax Department)  रडारवर असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात (Taapasee Pannu) इन्कम टॅक्स विभागाला मोठा पुरावा सापडला आहे. कोट्यवधींची हेराफेरी झाल्याचं आयटीला समजलं आहे. तब्बल  650 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे पुरावे IT विभागाच्या हाती लागले आहेत.

3 मार्चपासून IT विभागाने अभिनेता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या मालमत्तेवर छापेमारी (Income Tax Department Raid) सुरू केली. यामध्ये दोन फिल्म प्रोडक्शन कंपनी, दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचाही समावेश आहे.  मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबादमध्ये एकूण 28  ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यादरम्यान या प्रोडक्शन हाऊसच्या इन्कम आणि शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पुरावे सापडले आहेत.

तब्बल 650 कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याची दिसून आलंं आहे. 300 कोटी  रुपयांबाबत कंपनी काहीही माहिती देऊ शकली नाही. 350 कोटींची करचोरी असल्याचे पुरावे आयकर विभागाला सापडले आहेत. तापसी पन्नूच्या नावानं 5 कोटी रुपयांची कॅश रिसीटही सापडली आहे, ज्याचा तपास सुरू आहे. याशिवाय दिग्दर्शकाच्या करातही 20 कोटी रुपयांची गडबड असल्याचे पुरावे सापडले आहेत.

हे वाचा - PHOTO: इन्कम टॅक्सचा छापा पडण्यापुर्वी अनुरागनं घेतली होती ‘या’ नेत्याची भेट

दरम्यान फँटम आणि क्वान या दोन्ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत मोठ्या रकमेचा ई-मेल, व्हॉट्सप चॅट्स असा डिजीटल डेटा हार्ड डिस्क स्वरूपात सिझ करण्यात आला आहे. तसंच 7 बँक लॉकरही असल्याचं समजलं आहे, तेदेखील सिझ करण्यात आले आहेत. अद्यापही तपास सुरू आहे. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू राहू शकते, असं सांगितलं जातं आहे.

'फँटम फिल्म'आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

हे वाचा - सेक्स वर्कर म्हणून अभिनेत्रीची बदनामी; Amazon Prime ला न्यायालयाकडून दणका

दरम्यान या दोन्ही सेलिब्रिटींच्या समस्या अधिक वाढणार आहे. आयकर विभागानंतर  सक्तवसुली संचलनाद्वारे (ED) देखील त्यांची चौकशी केली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Anurag kashyap, Income tax