मुंबई, 27 सप्टेंबर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूसंबंधात समोर आलेल्या ड्रग केसमध्ये बॉलिवूडमध्ये बड्या स्टार्सची नावं समोर आली आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावं समोर आली आहेत. मात्र अभिनेत्री रकुल प्रीत सिंह याप्रकरणी होत असलेल्या मीडिया कव्हरेजमुळे त्रस्त झाली आहे. याप्रकरणी सुरू असणारे मीडिया कव्हरेज थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी तिने दिल्ली हायकोर्टाचा (Delhi High Court) दरवाजा ठोठावला आहे. तिने दिल्ली हायकोर्टाकडे एक अंतरिम निर्देश देण्याची मागणी केली आहे, ज्याअंतर्गत मीडियाला ड्रगशी संबंधित कोणताही लेख छापणे किंवा यासंबंधित कोणतीही माहिती प्रसारित करण्यापासून थांबवण्यात यावे.
सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) चौकशीमध्ये सारा अली खान आणि रकुल प्रीतचे नाव समोर आले होते. रकुलने शुक्रवारी एनसीबीसमोर तिचा जबाब नोंदवला आहे.तिची जवळपास चार तास चौकशी करण्यात आली होती. (हे वाचा- ‘माल है क्या’ बाबत NCB ने केलेल्या सवालांमुळे दीपिकाला कोसळलं रडू- सूत्र ) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी याप्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची देखील चौकशी केली. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी घडलेली मोठी घटना म्हणजे यामध्ये धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज रवि प्रसादची चौकशी झाल्यानंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली आहे.