अभिनेत्री सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला. ती अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांची मोठी मुलगी आहे. तिला इब्राहिम नावाचा एक लहान भाऊ आहे. याशिवाय तिला तैमूर आणि जहांगीर हे दोन सावत्र भाऊ आहेत. चार वर्षांची असताना साराने एका जाहिरातीत काम केलं होतं. नंतर 2004मध्ये ती नऊ वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. सैफला सुरुवातीला तिला किंवा तिच्या भावाला भेटण्याची परवानगी नव्हती; पण नंतर ते भेटू लागले आणि त्यांचं नातं अगदी मित्रांप्रमाणे आहे. साराने कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात डिग्री घेतली आहे.
टीनएजर असताना सारा खानला वाढत्या वज