JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'चिंध्यांसारखा ब्लाऊज घालून...', कंगनाने दीपिका पादुकोणला पुन्हा केलं टार्गेट

'चिंध्यांसारखा ब्लाऊज घालून...', कंगनाने दीपिका पादुकोणला पुन्हा केलं टार्गेट

दीपिका नुकतीच एका आंतरराष्ट्रीय जीन्स कंपनीची ग्लोबल ब्रॅन्ड अम्बेसेडर बनली आहे. तिने याची एक जाहिरातही शेअर केली आहे. या जाहिरातीमुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यावरून कंगना रणौतनेही एक ट्विट करत नाव न घेता दीपिका पदुकोणला टार्गेट केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मार्च: बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) एक वेगळी ओळख आहे. दीपिका पदुकोण नुकतीच एका आंतरराष्ट्रीय जीन्स कंपनीची ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (Levi’s Jeans Global Brand Ambassador) बनली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक जाहिरातही (Advertise) शेअर केली. या जाहिरातीमुळे आता मोठा वादाला (Controversial Ad) सुरुवात झाली आहे. ही घटना समोर येताच ट्विटर क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut) ट्वीट करून नाव न घेता दीपिकावर निशाणा साधला आहे. कंगना रणौतने एक ट्विट केलं आहे. यावेळी तिने आपल्या ट्विटमध्ये जुन्या काळातील महिलांचं कौतुक केलं आहे. यामध्ये तिने असं लिहिलं आहे की, या महिलांनी केवळ त्यांचं व्यक्तिमत्त्वच दर्शवलं नाही, तर संपूर्ण संस्कृतीचं आणि राष्ट्राचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. आजच्या जगात अशाप्रकारे यश मिळवणाऱ्या महिलांचे फोटो काढले जातात. ज्यामध्ये त्या फाटलेल्या अमेरिकन जीन्स आणि चिंध्याप्रमाणे ब्लाउज परिधान करतात. या महिला अमेरिकन मार्केटींगशिवाय इतर कशाचंही प्रतिनिधित्व करत नाहीत.

(वाचा -  VIDEO: लग्न कधी करणार? श्रद्धा कपूरनं मराठीत दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली… )

संबंधित बातम्या

कंगनाने या पोस्टमध्ये तीन महिलांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. या महिला भारत, जपान आणि सीरियाच्या असल्याची माहिती समोर आली आहे. कंगनाने या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या महिलांनी 1885 साली हे फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी आपला पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून कंगनाने भलेही दीपिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र या ट्विटनंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कंगनालाच ट्रोल करायला सुरू केलं आहे. (वाचा - शिवसेनेकडून जीवाला धोका, खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवावे, कंगनाची मागणी ) याशिवाय प्रसिद्ध हॉलीवूड पटकथा लेखक आणि ‘ये बॅलेट’ च्या दिग्दर्शक सोनी तारापोरेवाला यांनी दीपिकावर चोरीचा आरोप करत सोशल मीडियावर जोरदार हल्ला चढविला आहे. सोनी तारोपोरेवाला यांनी नुकतीच दीपिकाची ही व्हायरल झालेली जाहिरात पाहिली, त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये काही स्क्रीनशॉट्स आहेत. ही पोस्ट शेअर करताना सोनी यांनी लिहिलं की, ‘काही दिवसांपूर्वी मी या जीन्सची जाहिरात पाहिली. या जाहिरातीत माझ्या ‘ये बॅलेट’ या चित्रपटाचा सेट पाहून मला धक्काच बसला आहे.’ सोनी यांच्या या ट्विटनंतर दीपिका पदुकोणची नवीन जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या