VIDEO: लग्न कधी करणार? श्रद्धा कपूरनं मराठीत दिलं 'हे' उत्तर, म्हणाली...
34 व्या वाढदिवाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण सोबतच काही चाहत्यांनी मात्र ती लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. अर्थातच हा प्रश्न यापूर्वी देखील तिला अनेकदा विचारण्यात आला आहे. परंतु यावेळी मात्र तिनं आपल्या लग्नावर मराठीत उत्तर देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. (Shraddha Kapoor marriage plan)
मुंबई 3 मार्च: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्रद्धाचा आज वाढदिवस आहे. (Happy Birthday Shraddha Kapoor) आपला वाढदिवस ती मालदीवमध्ये साजरा करत आहे. 34 व्या वाढदिवाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण सोबतच काही चाहत्यांनी मात्र ती लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. अर्थातच हा प्रश्न यापूर्वी देखील तिला अनेकदा विचारण्यात आला आहे. परंतु यावेळी मात्र तिनं आपल्या लग्नावर मराठीत उत्तर देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. (Shraddha Kapoor marriage plan)
अलिकडेच मालदीव येथे जाण्यासाठी श्रद्धा मुंबई विमानतळावर पोहोचली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही चाहत्यांनी तिला नेहमीप्रमाणेच लग्नाबाबत सवाल केला. काय श्रद्धा लग्नाबाबत काही विचार केलास की नाही? यावर ती म्हणाली काय म्हणतो आहेस? घाबरु नको लग्न करण्यापूर्वी तुला नक्की सांगेन. असं गंमतीशीर उत्तर तिनं दिलं. तिचं हे उत्तर ऐकून सर्वांनाच हसू आलं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
श्रद्धा गेल्या काही महिने रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा आहे. रोहन हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. एका फोटोशूटच्या निमित्तानं त्यांची भेट झाली होती. पुढे भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं. अन् आता ते दोघं एकमेंकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये त्यांना एकत्र पाहिलं गेलं आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच ते लग्न करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान श्रद्धांने मात्र याबाबत काहीच खुलासा केलेला नाही. श्रेष्ठ बाबत प्रश्न विचारताच ती विषय टाळण्याचा प्रयत्न करते.
श्रद्धा कपूर ही अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे. 2010 साली तिनं तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर लव्ह का दी एंड, गोरी तेरी प्यार मै, उंगली, बागी, रॉक ऑन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. सुरुवातीला श्रद्धावर प्रचंड टीका करण्यात आली होती. अभिनय येत नसतानाही केवळ घराणेशाहीमुळं तिला काम मिळतंय असं म्हटलं जात होतं. परंतु आशिकी 2, हैदर, छिछोरे, स्त्री या चित्रपटांमध्ये तिने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली.