JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आई काजोलच्या गाण्यावर लेक न्यासाचे ठुमके; व्हायरल होतोय DANCE VIDEO

आई काजोलच्या गाण्यावर लेक न्यासाचे ठुमके; व्हायरल होतोय DANCE VIDEO

अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा (nyasa devgan) तिच्या या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : सध्याच्या काळात बॉलिवूड कलाकारांइतकीच (bollywood stars) त्यांची मुलंसुद्धा (starkids) प्रसिद्धीच्या झोतात असतात. प्रत्येक स्टारकिड्स सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतं. त्यामुळे चित्रपटांमध्ये येण्याआधीच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळालेली असते आणि त्यांचे चाहतेसुद्धा तयार झालेले असतात. बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या (shahrukh khan daughter) मुलीपासून ते काजोल-अजयच्या मुलीपर्यंत (kajol daughter) सर्वच सोशल मीडियावर वारंवार चर्चेत येतात. आत्तासुद्धा अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा (nyasa devgan) एका खास कारणाने चर्चेत आली आहे. नुकताच न्यासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (video viral on social media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती चक्क आई काजोलच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन यांची मुलगी न्यासा ही सोशल मीडियावर तितकी अॅक्टिव्ह नसली तरी आई काजोल सतत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. न्यासाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती काजोलच्या ‘बोल चुडीयां, सजदा आणि तेरे नैना’ या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये ती एकटी नसून तिचा संपूर्ण ग्रुपसुद्धा आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओच्या शेवटी न्यासाने करीना कपूर आणि शाहीदच्या ‘नगाडा’ या गाण्यावरसुद्धा धम्माल डान्स केला आहे. सोशल मीडियावर चाहते अजय आणि काजोलच्या मुलीच्या डान्सचं तुफान कौतुक करत आहेत. हे वाचा -  ‘अंतर्वस्त्र परिधान केली की नाही?’; हटके स्टाईलमुळं प्रियांका चोप्रा होतेय ट्रोल न्यासाही अजून 19 वर्षांची आहे. येत्या 20 एप्रिलला ती 20 वर्षांची होणार आहे. त्याआधीच ती आपल्या आईवडिलांप्रमाणे प्रसिद्ध झाली आहे. न्यासा तिच्या कपड्यांमुळे सतत ट्रोल होतं असते. न्यासा सतत आपल्या शॉर्ट कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मात्र तिला याचा अजिबात फरक पडत नाही. त्याचबरोबर न्यासाला तिच्या सावळ्या रंगावरून सुद्धा ट्रोल केलं जातं. ट्रोलर्स तर न्यासाला अजय देवगनची कार्बन कॉपी म्हणून देखील डिवचतात. हे वाचा -  ‘खतरों के खिलाडी 11’च्या स्पर्धकांची यादी जाहीर, हे कलाकार सामिल होणार ) अजय देवगन आणि काजोल यांनी 1999 मध्ये लग्नं केलं होतं. या जोडीने अनेक चित्रपटांत सोबत काम केलं आहे. लग्नावेळी काजोलचं वय फार कमी होतं. त्यामुळे तिचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. मात्र काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. काजोल आणि अजयच्या लग्नाला तब्बल 23 वर्षे झाली आहेत. या दोघांना मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी दोन मुलं आहेत. काजोल आणि अजय आपल्या मुलांना नेहमीच माध्यमांपासून दूर ठेवत होते. मात्र हळूहळू तेसुद्धा प्रसिद्धी झोतात येऊ लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या