मुंबई, 12एप्रिल- बॉलीवूडच्या अभिनेत्री(bollywood actress) नेहमीचं आपल्या हटके स्टाईलमुळे ओळखल्या जातात. त्यांच्या प्रत्येक लुकची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या या आगळ्यावेगळ्या अंदाजामुळे कधी त्या प्रसिद्ध होतात तर कधी ट्रोलसुद्धा होतात. अभिनेत्री प्रियंका चोप्रासुद्धा(priyanka chopra) आपल्या अशाचं हटके अंदाजामुळे चर्चेत आली आहे. नुकताच प्रियांकाने बाफ्टा (BAFTA)मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने परिधान केलेल्या पोशाखामुळे(priyanka chopra look) ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
बहुचर्चित असा ‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. ‘ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड’ म्हणजेच बाफ्टा असं संबोधल जातं. या पुरस्कार सोहळ्याचं हे 72 वा वर्ष होतं. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गजांसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रासुद्धा आपल्या पती निक जोनस सोबत उपस्थित होती. यावेळी प्रियांकाचा कुल लुक दिसून आला. प्रियांकानं यावेळी गुलाबी रंगाचा नक्षीकाम केलेला फक्त कोट परिधान केला होता. आणि त्याच्या खाली पांढऱ्या रंगाचा सिल्क ट्राऊझर सुद्धा घातला होता. या कपड्यांमध्ये देसी गर्ल सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
अवश्य पाहा - ‘अहो काकी भाजी कितीला देणार?’; विचित्र फोटोशूटमुळं रुबिना दिलैक होतेय ट्रोल
View this post on Instagram
इतकचं नव्हे तर प्रियांकानं यावेळी आणखी एक वेशसुद्धा परिधान केला होता. या दुसऱ्या वेशामध्ये ती काळ्या रंगाच्या पाश्चिमात्य गाऊनमध्ये दिसून आली. हे दोन्ही लुक प्रियांकाला खुपचं खुलून दिसत होते. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोन्ही वेशातील काही फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून भरभरून लाईक आणि कमेंट्स सुद्धा येत आहेत. प्रियांका सोबत पती निकसुद्धा दिसून येतं आहे. काहींना हा लुक खुपचं आवडला आहे. तर प्रियांकाने कोटच्या आत काहीचं घातलं नाही यावरून तिला ट्रोलसुद्धा केलं जातं आहे. प्रियांका चोप्रा याआधी सुद्धा आपल्या आगळ्यावेगळ्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे आणि ट्रोलसुद्धा झाली आहे. मात्र प्रियांकाला ट्रोलर्सचा काहीही फरक पडत नाही. ती सतत आपला हटके लुक कॅरी करत असते.
View this post on Instagram
बॉलीवूडची देसीगर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा फक्त बॉलीवूड पुरताच मर्यादित नाही राहिली तर तिनं आंतराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.नुकताच प्रियांकाने न्युयॉर्कमध्ये भारतीय रेस्टोरंट सुद्धा सुरु केलं आहे. त्याचं नाव ‘सोना’ असं ठेवण्यात आलं आहे.यावरून प्रियंका फक्त एक अभिनेत्रीच नव्हे तर चांगली व्यावसायिक सुद्धा असल्याचं दिसून येतं.
(हे वाचा: ‘ऑस्कर' स्विकारताना होती ही चिंता’; ए. आर.रेहमान यांनी सांगितला किस्सा)
‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळा कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुढे ढकलण्यात आला होता. मात्र अखेर तो ऑनलाईन पद्धतीने पार पडला. बाफ्टा पुरस्कार सोहळा 10 ते 11 एप्रिल रोजी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये घेण्यात आला. मात्र हा सोहळा ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘द फायर’ फेम अभिनेता एंन्थनी हॉकिन्स यांना जाहीर करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘नॉमलेंड’ला देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Priyanka chopra