'डीजे वाले बाबू' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली गायिका आस्था गिल 'खतरों के खिलाडी 11' मध्ये झळकण्याची शक्यता आहे. नुकताच शोच्या मेकर्सनी तिच्यासोबत संवाद साधला आहे.
2/ 8
बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेता एजाज खानला सुद्धा खतरों के खिलाडीसाठी निवडण्यात आलं आहे. नुकताच एजाज बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
3/ 8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आणि निवेदक अर्जुन बिजलानीसुद्धा या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
4/ 8
गायक आणि बिग बॉस 14 स्पर्धक राहुल वैद्य यानेही खतरों के खिलाडी शोसाठी मेकर्सला होकार कळवला असल्याची माहिती आहे.
5/ 8
'महाभारत' या पौराणिक मालिकेत 'श्रीकृष्ण' ही भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ राज हा सुद्धा खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे.
6/ 8
'रोडीज' या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेला अभिनेता वरुण सूदसुद्धा खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे.
7/ 8
छोट्या पडद्यावरील चेहरा आणि बिग बॉस 14 स्पर्धक अभिनव शुक्लाही रोहित शेट्टीच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
8/ 8
बिग बॉस 14 मध्ये निक्की तांबोळीनं खुपचं चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे खतरों के खिलाडी साठी तिची निवड करण्यात आली आहे.