JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मंगळ होता म्हणून ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनआधी खरंच पिंपळाशी लग्न केलं होतं?

मंगळ होता म्हणून ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनआधी खरंच पिंपळाशी लग्न केलं होतं?

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या लग्नावेळी ही चर्चा रंगली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 एप्रिल: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)  आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या लग्नाला आता 14 वर्षे पूर्ण (Aishwarya Rai Abhishek Bachchan wedding anniversery) झाली आहेत. 20 एप्रिल 2007 साली दोघांचं लग्न झालं होतं. पण आजही त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाविषयी अनेक प्रश्न पडतात. त्यापैकीच एक म्हणजए मंगळ असलेल्या ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्याआधी एका झाडाशी लग्न केलं होतं का? अशा अनेक चर्चा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नवेळी पसरल्या होत्या. अभिनेत्री ऐश्वर्या रायला मंगळ असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे ऐश्वर्याचा विवाह झाला तरी तो फार काळ टिकणार नाही आणि टिकवायचं असेल तर ऐश्वर्याला काही विधी करावे लागतील असंही सांगण्यात आलं होतं आणि त्यासाठीच ऐश्वर्याने आधी एका झाडाशी विवाह केल्याच्या चर्चा रंगल्या.

संबंधित बातम्या

त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन तसंच संपूर्ण बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या हे काशी विश्वनाथला गेले होते. तिथं संकट मोचन मंदिरात ऐश्वर्याचं पिंपळाच्या झाडाशी लग्न लावण्यात आलं होतं, अशा अनेक बातम्या पसरल्या होत्या. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय केला होता असंही सांगण्यात आलं. पण मंदिरातील पुजारी श्रीकांत मिश्रा यांनी सांगितलं होतं की, संपूर्ण बच्चन परिवार केवळ मंदिरात दर्शन करण्यासाठी आलं होतं. हे वाचा -  टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद; दिशा पाटनीचे HOT PHOTO VIRAL ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिषेकने खुलासा केल्याप्रमाणे 2007 साली न्यूयॉर्कच्या एका हॉटेल मध्ये त्याने ऐश्वर्याला प्रपोझ केलं होतं आणि त्यानंतर तिने लग्नाला होकार दिला होता. तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आता 10 वर्षाची आराध्या नावाची मुलगीदेखील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या