JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'भारतात गांजा कायदेशीर झाला पाहिजे...', या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

'भारतात गांजा कायदेशीर झाला पाहिजे...', या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

रणवीर शौरी (Ranvir Shaurey) या बॉलिवूड अभिनेत्याने भारतात गांजा कायदेशीर करावा असे भाष्य केले आहे. त्याने यावेळी बॉलिवूडमधील ड्रग सेवनाबद्दल होत असलेल्या चर्चेबद्दल देखील भाष्य केले आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑक्टोबर : अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey)सध्या त्याच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यस्त आहे. विविध प्लॅटफॉर्ममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा ‘लुटकेस’ हा सिनेमा देखील नुकताच प्रसिद्ध झाला होता. ‘High’ मधील कामाबाबत देखील त्याचे  कौतुक होत आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या परखड मतासांठी रणवीर शौरी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर रणवीरने त्याची काही परखड मतं सोशल मीडियावर मांडली होती. दरम्यान रणवीर शौरीने नुकतेच ‘ड्रग्ज’ बाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील ड्रग सेवनाबद्दल त्याने त्याची मतं मांडली आहेत. दरम्यान यावेळी रणवीर शौरीने गांजा भारतात लीगल करण्याबाबत भाष्य केले आहे. अभिनेता रणवीर शौरीने भारतात गांजा कायदेशीर केला जावा याबाबत भाष्य केले आहे

अभिनेता रणवीर शौरीने भारतात गांजा कायदेशीर केला जावा याबाबत भाष्य केले आहे

अभिनेता रणवीर शौरीला बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचे होणारे सेवन आणि याप्रकरणी सुरू असलेला एनसीबीचा तपास याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अभिनेत्याने हिंदुस्तान टाइम्स शी केलेल्या संभाषणात असे म्हटले आहे की, ‘मला असे वाटते की, बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर तेवढाच होतो जेवढा सामान्य स्तरावर समाजामध्ये होतो. मी नॉन बॉलिवूड पार्ट्यांमध्ये देखील ड्रग्जचा वापर होताना पाहिला आहे.’ (हे वाचा- ‘ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि…’,पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत) या मुलाखतीदरम्यान रणवीर शौरीने असे म्हटले आहे की भारतात ड्रग्ज कायदेशीर करायला हवे. त्याने असे म्हटले की, ‘मी असे मानतो की भारतात गांजा लीगर व्हायला हवा. हे खूप जुन्या कायद्यावर आधारित आहे. अनेक देशांमध्ये गांजा लीगल आहे. 100 वर्षं जुने कायदे अद्याप बदलले नाही आहेत. गांजा त्या कायद्यांपैकी एक आहे. गांजाबाबतीतील नियम बदलायला हवे.’ (हे वाचा- टॅटू काढल्यामुळे ट्रोल झाली आमीर खानची मुलगी,सोशल मीडिया युजर्सच्या अशा कमेंट्स ) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग प्रकरण विशेष गाजते आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death Case) बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन समोर आले आहे. याप्रकणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती तर अडचणीत आलेच आहेत, पण त्याचबरोबर बॉलिवूडमधील काही मोठी नावं यामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, दीपिका पादूकोण, सारा अली खान यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. तसंच एनसीबीचे तपासकार्य मुंबई, बॉलिवूड आणि ड्रग्ज या गोष्टींभोवती अद्याप सुरूच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या