जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि...', पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत

'ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि...', पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत

'ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि...', पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत

अभिनेत्री पायल घोषने एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये तिने तिच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्रीने तिला माफियांपासून धोका असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांना तिने या ट्वीटमध्ये टॅग केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर : अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) वर केलेल्या आरोपांमुळे ती चर्चेत आली होती. पायलने अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत दिग्दर्शकावर Metoo चा आरोप केला होता. याप्रकरणात तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी देखील करण्यात आली होती. अनुराग कश्यपने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान पायलने नुकतेच एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे. पायल घोषने असे म्हटले आहे की, ’ सर ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि माझ्या मरणाला ते आत्महत्या किंवा आणखी काहीतरी केल्याचे सिद्ध करतील.’ (हे वाचा- 15 ऑक्टोबरपासून उघडणार चित्रपटगृहं, सर्वात आधी ‘हा’ सिनेमा होणार प्रदर्शित ) अभिनेत्री पायल घोष या ट्वीटमधून कुणाचेही नाव न घेता टीका करत आहे. अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपानंतर तिचे आयुष्य धोक्यात असल्याचे तिचे म्हणणे आहे.

जाहिरात

पायल घोष आणि ऋचा चड्ढाचा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करताना ऋचा चढ्ढाचे नाव घेतले होते. ज्यानंतर पायल घोषवर अभिनेत्रीने मानहानीचा दावा ठोकला होता. ऋचा चड्ढाने हा दावा जिंकल्याचे तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून सांगितले आहे. (हे वाचा- टॅटू काढल्यामुळे ट्रोल झाली आमीर खानची मुलगी,सोशल मीडिया युजर्सच्या अशा कमेंट्स) तिने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाची एक कॉपी देखील शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने असे म्हटले आहे की, ‘आम्ही जिंकलो, सत्यमेव जयते. मी मुंबई उच्च न्यायालयाची आभारी आहे. हा निर्णय आता सार्वजनिक रेकॉर्डमध्ये आहे आणि मुंबई हायकोर्टाच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात