सोशल मीडियाचा गैरवापर अनेकदा केला जातो. काही वेळा स्टार्सना ट्रोल केलं जातं तर कधी स्टारकिड्सना देखील. असाच काहीसा प्रकार आमीर खानच्या मुलीबरोबर घडला आहे. तिच्यावर टीका करताना तिला रुढीवादी धार्मिक शिस्तीची आठवण करून देण्यात आली. (फोटो - इन्स्टाग्राम)
2/ 7
सोशल मीडियावर सेलिब्रिटींबाबत विविध चर्चा केल्या जातात. त्यांची लाइफस्टाइल फॉलो केली जाते, त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याबाबत देखील युजर्सना जाणून घ्यायचे असते (फोटो: इन्स्टाग्राम)
3/ 7
काही सेलेब्सवर तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून टीका केली जाते आणि असाच काहीसा प्रकार इरा खान बरोबर घडला (फोटो: इन्स्टाग्राम)
4/ 7
इरा खान आता टॅटू काढल्यामुळे ट्रोल झाली आहे. ती नुकतीच टॅटू बनवण्यास शिकली होती, तर तिने तिच्या ट्रेनरच्या हातावर एक टॅटू बनवला. या टॅटूचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/ 7
इरा खान तिचं TO DO लिस्टमधील एक काम पूर्ण झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे तिने गंमतीत असं देखील म्हटलं की तिच्यासमोर आता करिअरचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
6/ 7
इराची ही पोस्ट वाचून अनेकांनी तिला नैतिकतेचे धडे दिले. ती एक 'पवित्र मुस्लीम' नाही अशा शब्दात देखील लोकांनी तिच्यावर टीका केली. ही कला इस्लाममध्ये पाप असल्याचेही लोकं म्हणाले. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
7/ 7
इराने या अशा ट्रोलर्सना उत्तर देणं नेहमीप्रमाणेच टाळलं आहे. त्याचप्रमाणे तिच्या टॅटूच्या नवीन कलेचं कौतुक देखील करण्यात आलं (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)