JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मला खूप वेदना होत आहेत', राजीव कपूर यांच्या निधनाने हळहळली मराठमोळी अभिनेत्री

'मला खूप वेदना होत आहेत', राजीव कपूर यांच्या निधनाने हळहळली मराठमोळी अभिनेत्री

मराठी अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये राजीव कपूर यांच्यासह काम केलं होतं. ती त्यांना खूप जवळून ओळखत होती.

जाहिरात

Ashwini bhave

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी: ऋषी कपूर (Rishi kapoor) यांचे लहान भाऊ आणि राज कपूर (Raj Kapoor) यांचे लहान पुत्र राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचं काल निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं असून मराठी अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. हिना (Henna) चित्रपटातील कलाकार असलेल्या अश्विनी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिना (Henna) चित्रपटाचे निर्माते राजीव कपूर होते. या चित्रपटात अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ई टाइम्सशी बोलताना त्यांनी राजीव यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाला, “राजीव यांचं निधन झाल्याचं समजल्यानंतर खूप दुःख झालं. ते प्रतिभाशाली अभिनेते आणि दिग्दर्शक होते. याचबरोबर ते खूपच दयाळू माणूस होते. कपूर कुटुंबाने खूप कमी कालावधीत आपली अनेक जवळची माणसं गमावली असल्यानं मला खूप वेदना होत आहेत.  मी कपूर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करते, असं म्हटलं आहे. हे वाचा -  Rajiv Kapoor Death: करीनाची अवस्था पाहून बसेल धक्का, PHOTO आले समोर राजीव कपूर यांनी राम तेरी गंगा मैली (Ram Teri Ganga Maili)  या चित्रपटातून मुख्य भूमिकेसाठी पदार्पण केलं होतं. आपल्या कारकीर्दीत त्यांनी हम तो चले परदेस, शुक्रिया, लावा यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. पण संपूर्ण कारकिर्दीत त्यांचा केवळ  राम तेरी गंगा मैली हा चित्रपट यशस्वी ठरला होता. 1990 मध्ये आलेल्या ‘जिम्मेदार’ या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. बॉलिवूडमध्ये जवळपास 31 वर्षांनंतर त्यांनी पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला होता. संजय दत्त याच्याबरोबर मिळून ते तुलसीदास जूनियर’ (Toolsidas Junior) या सिनेमावर काम करत होते. पण आता या चित्रपटाचं पुढे काय होणार हे माहित नाही. हे वाचा -  सलमान खानच्या काळवीट शिकार खटल्याला आता नवं वळण, अंतिम सुनावणी उद्याच त्यांच्यावर काल चेंबूरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चेंबूरमध्ये झालेल्या अंत्यसंस्कारामध्ये कपूर कुटुंबातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. रणबीर कपूर, नीतू सिंह, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, बहीण रिमा जैन आणि भाऊ रणधीर कपूर यांच्यासह एकूण 24 जण उपस्थित होते. मागील वर्षभरात कपूर कुटुंबाने आपल्या जवळच्या 2 व्यक्तींना गमावलं आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर आता राजीव यांचं निधन झाल्यानं कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या