मुंबई, 21 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय किक्रेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना पाहण्यात आलं आहे. मुंबईतील वांद्रे येथे या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. अनुष्का शर्मा क्लिनिक व्हिजिटसाठी पोहचली असताना या दोघांना स्पॉट करण्यात आलं. विराट-अनुष्का त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर जवळपास 10 दिवसांनी सार्वजनिकरित्या दिसले. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर विरुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 11 जानेवारी रोजी विराट कोहलीने त्यांना मुलगी झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने, सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभारही मानले होते. तसंच मुलीच्या जन्मानंतर विराट-अनुष्काने त्यांची प्रायव्हसी जपण्याबाबतही विनंती केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये विराटने एक पोस्ट शेअर करत, तिसरा व्यक्ती येणार असल्याची बातमी दिली होती.
मुलीच्या जन्मानंतर विराटने त्याची ट्विटरवरील ओळख (Twitter Bio) बदलली आहे. त्यामध्ये त्यानं फक्त A proud husband and father! इतकीच स्वत:ची ओळख ठेवली आहे. विशेष म्हणजे ज्यासाठी विराट जगभर प्रसिद्ध आहे, तो ‘भारतीय क्रिकेटपटू’ हा उल्लेख विराटनं यामधून काढला आहे. विराटची ही नवी ओळख देखील त्याच्या फॅन्सना आवडली असून अनेकांनी त्याचं यासाठी अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, विरुष्काच्या मुलीच्या जन्मानंतर अनेक चाहत्यांनी त्यांच्या बाळासाठी काही नावंही सुचवली आहेत. काहींनी विराट आणि अनुष्का या दोन नावांना एकत्र करून विविध नावं सुचवली. यामध्ये विरुष्का, अन्वी, अवनी, अनुवी अशी विविध नावं सुचवली