मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहलीने ‘ट्विटर Bio’ वरुन भारतीय क्रिकेटपटू हा उल्लेख काढला!

विराट कोहलीने ‘ट्विटर Bio’ वरुन भारतीय क्रिकेटपटू हा उल्लेख काढला!

विराट कोहलीनं (Virat Kohli) नुकतीच त्याची ट्विटरवरील ओळख (Twitter Bio) बदलली आहे. त्यामध्ये त्यानं फक्त A proud husband and father!  इतकीच स्वत:ची ओळख ठेवली आहे.

विराट कोहलीनं (Virat Kohli) नुकतीच त्याची ट्विटरवरील ओळख (Twitter Bio) बदलली आहे. त्यामध्ये त्यानं फक्त A proud husband and father! इतकीच स्वत:ची ओळख ठेवली आहे.

विराट कोहलीनं (Virat Kohli) नुकतीच त्याची ट्विटरवरील ओळख (Twitter Bio) बदलली आहे. त्यामध्ये त्यानं फक्त A proud husband and father! इतकीच स्वत:ची ओळख ठेवली आहे.

मुंबई, 18 जानेवारी : टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या पितृत्वाच्या रजेवर (Paternity Leave) आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये भारत – ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमची कॅप्टनसी करत आहे.

विराटनं 11 जानेवारी रोजी ट्विटरवरुन (Twitter) त्याला आणि अनुष्का शर्माला (Anushka Sharma) मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याचबरोबर सर्वांचं प्रेम आणि शुभेच्छांबद्दल आभार मानले होते.

विराटला त्याच्या या नव्या भूमिकेमध्ये चांगलाच एकरुप झाला आहे. विराटनं नुकतीच त्याची ट्विटरवरील ओळख (Twitter Bio) बदलली आहे. त्यामध्ये त्यानं फक्त A proud husband and father!  इतकीच स्वत:ची ओळख ठेवली आहे. विशेष म्हणजे ज्यासाठी विराट जगभर प्रसिद्ध आहे, तो ‘भारतीय क्रिकेटपटू’ हा उल्लेख विराटनं यामधून काढला आहे. विराटची ही नवी ओळख देखील त्याच्या फॅन्सना आवडली असून अनेकांनी त्याचं यासाठी अभिनंदन केलं आहे.

(वाचा - भारताचे दिग्गज स्पिनर चंद्रशेखर यांची तब्येत खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल!)

 विराट कोहली ने अपने ट्विटर के बायो को बदलते हुए अब लिखा है- एक गौरवशाली पति और पिता. इसके साथ विराट ने दिल का इमोजी भी बनाया है. विराट कोहली का यह नया बायो फैन्स को भी काफी पसंद आ रह है और वह इसके लिए विराट की तारीफ भी कर रहे हैं. (Virat Kohli/Twitter)

विराट कोहलीनं मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अनुष्का शर्मासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो फोटो शेअर करुन जानेवारी 2021 मध्ये घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची बातमी त्यानं सर्वांना दिली होती. त्यानंतर विराट आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी युएईमध्ये रवाना झाला. या दौऱ्यात अनुष्का शर्मा देखील त्याच्याबरोबर होती.

(वाचा - VIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर)

नव्या क्लबमध्ये विराट

विराटला मुलगी झाल्यानं तो आता मुलीचा बाबा झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. विराटसह महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, गौतम गंभीर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, ऋद्धीमान साहा, हरभजन सिंह, टी नटराजन आणि उमेश यादव या भारतीय क्रिकेटपटूंना मुलगी आहे.

(वाचा - 'तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया)

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी या सर्व क्रिकेटपटूंची नाव असलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्या फोटसोबत ‘भविष्यातील क्रिकेट टीम तयार होत आहे’ असं कॅप्शन त्यांनी दिलं होतं.

First published:

Tags: Cricket, Virat anushka