जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अनुवी', 'विरुष्का' ते अगदी सिडनी! विराट-अनुष्काच्या मुलीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली ही नावं

'अनुवी', 'विरुष्का' ते अगदी सिडनी! विराट-अनुष्काच्या मुलीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली ही नावं

'अनुवी', 'विरुष्का' ते अगदी सिडनी! विराट-अनुष्काच्या मुलीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली ही नावं

काल अनुष्कानं (Anushka sharma) एका गोंडस मुलीला (Baby girl) जन्म (Birth) दिला आहे. याची माहिती विराट कोहलीनं (Virat kohli) स्वतः आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ही पोस्ट व्हायरल झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा धमाकेदार बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) या कपलच्या घरात सोमवारी एका छोट्या पाहुणीनं प्रवेश केला आहे. काल अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याची माहिती विराट कोहलीनं स्वतः आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ही पोस्ट व्हायरल झाली. आणि नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी त्यांच्या बाळाचं नाव सुचवायला सुरुवात केली. विराट कोहलीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “आम्हाला जाहीर करण्यात अत्यंत आनंद होत आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आमच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. पण या क्षणी आमचं खासगीपण जपण्याच्या अधिकाराचा आपण सगळे मान राखाल”. अनुष्कानं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. अगदी तेव्हा पासूनच या स्टार कपलचं बाळ चर्चेत यायला लागलं. जन्माच्या अगोदरचं लोकांनी या स्टार कपलच्या बाळाला सेलिब्रिटी बनवलं होतं. (हे वाचा- VIDEO : जॉनी लीवरच्या मुलीची तुफान कॉमेडी; कंगना, सोनम, करीनाची केली मिमिक्री ) विराटनं काल सायंकाळी मुलगी झाल्याचं जाहीर करताच, ट्विटरवर एक वेगळाच ट्रेन्ड सुरू झाला. क्रिकेट आणि बॉलिवूड प्रेमींकडून या मुलीसाठी नावं सुचवण्यात येऊ लागली. विराट-अनुष्का या जोडीच्या मुलीचं नाव काय असेल, याचे अनेक अंदाज नेटकऱ्यांनी आपापल्या कल्पनेनुसार बांधायला सुरू केली. यामध्ये काहींनी विराट आणि अनुष्का या दोन नावांना एकत्र करून विविध नावं सुचवली. यामध्ये विरुष्का, अन्वी, अवनी, अनुवी अशी विविध नावं सुचवली तर काही क्रिकेट चाहत्यांनी मुलीचं नाव ‘सिडनी’ असं सांगितलं. नेटकऱ्यांनी आपल्या कल्पनेचा विस्तार करीत खालील नावं सुचवली आहेत. त्यामागं त्यांची काय कल्पना होती, याचं स्पष्टीकरणही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलं आहे. चला तर मग पाहुया यातील काही भन्नाट नावं आणि त्याचं स्पष्टीकरण.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

काही लोकांनी मनोरंजनात्मक पद्धतीनं नावं सुचवली. तर भविष्यातील समस्या लक्षात घेवून कोणत्या अक्षरापासून नावं ठेवू नये, याच्या सुचनाही केल्या.

विराट- अनुष्का या जोडप्यानं या मुलीचं नाव काय असेल याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याच बरोबर त्यांनी आपल्या मुलीचा पहिला फोटोही शेअर केला नाही. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीनं काल एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्या फोटोत नवजात बाळाचे पाय दिसतात. पण तो फोटो खरा नसून जनेरिक असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात