सुधीर कुमार, मुजफ्फरपूर, 29 सप्टेंबर : बिहारमधील आणखी एका गुणी कलाकाराचा मुंबईत मृत्यू झाला आहे. 26 वर्षीय अक्षत उत्कर्ष (Akshat Utkarsh) च्या जाण्याने त्याचे कुटुंबीय पुरते हादरले आहेत. त्याच्या मृत्यूसाठी ‘फीमेल फॅक्टर’ जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात मुंबई पोलिसांवर निष्काळजीपणावर देखील आरोप केला जात आहे. अशी माहिती मिळाली आहे की, अक्षत उत्कर्ष अंधेरी वेस्टमधील त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडला. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या आहे. मात्र याबात अधिक तपास सुरू आहे.
अभिनेत्याचे कुटुंबीया त्याच्या मृत्यूमागे हत्येचा कट असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मृत्यूच्या तीन तास आधी अक्षतचे त्याच्या वडिलांशी फोनवरून बोलणे झाले होते. मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवासी असून विजयंत चौधरी उर्फ राजू चौधरी यांचा तो मुलगा होता. तो भोजपुरी सिनेमात त्याचे नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात होता. लखनऊमधून त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो मुंबईत राहत होता आणि अंधेरी वेस्टमधील आरटीओ ऑनलाइन सुरेश नगर स्थित एका भाड्याच्या घरात तो राहत होता. याठिकाणी त्याच्याबरोबर स्ट्रगलर अभिनेत्री स्नेहा चौहान राहत असे. अक्षतचे काका विक्रम किशोर यांनी अशी माहिती दिली की अक्षत आणि स्नेहामध्ये खूप जवळीक होते. त्याचप्रमाणे त्याच्या काकांनी आकांक्षा दुबे नावाच्या आणखी एका मुलीबाबत भाष्य केले, जी अक्षतची एमबीए दरम्यानची क्लासमेट होती. (हे वाचा- नोरा फतेहीला ‘चुकीच्या’ ठिकाणी स्पर्श केल्याच्या आरोपाबाबत टेरेन्सचं स्पष्टीकरण ) कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षत रात्री 8.45 मिनिटांनी त्याच्या बाबांशी बोलला होता. त्यावेळी त्यांचे नीट बोलणे झाले आणि उशिरा रात्री स्नेहाच्या बेंगळुरूमधील भावाने त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना दिली. या घटनेने मुजफ्फरपूरमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. 29 सप्टेंबर रोजी त्याचे मामा रंजू सिंह आणि काका किशोर त्याचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार अक्षतच्या कुटुंबीयांकडे त्याचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला आहे. (हे वाचा- सुशांतच्या अंत्यसंस्काराचा VIDEO पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली…) रंजित सिंह यांनी असे म्हटले आहे की, त्यांना अंधेरी वेस्ट पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. अक्षतच्या मृत्यूची एफआयआर कॉपी दिली नाही आणि ज्या मृतदेहाबरोबर जे चालान दिले गेले होते तेदेखील मराठी भाषेत लिहिलेले आहे, जे कोणालाही समजू शकत नाही. विक्रांत किशोर यांनी सांगितले की जेव्हा ते फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा स्नेहा चौहान तेथे हजर होती. तिने सांगितले की, अक्षत पंख्याला लटकलेला सापडला आणि त्याच्या गळ्यामध्ये गमछाचा गळफास होता. अक्षयच्या मृत्यूशी त्याची जोडीदार स्नेहा चौहानचा संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांकडून चौकशीची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. अक्षतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.