मुंबई, 29 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. याप्रकरणी एकीकडे सीबीआय त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहे, तर दुसरीकडे त्याचे चाहते आणि कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. या सर्व प्रकरणादरम्यान ट्विटरवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अंत्यसंस्कारांच्या दरम्यानचा एक व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) राग अनावर झाला आणि तिने त्या युजरला चांगलेच सुनावले आहे. तिने हा व्हिडीओ त्वरित डिलिट करण्यास सांगितले आहे. एका ट्विटर युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ सुशांतच्या अंत्यसंस्कारा दरम्यानचा आहे. या युजरने हा व्हिडीओ शेअर करताना असे लिहले आहे की, ‘मला हा व्हिडीओ शेअर करायचा नव्हता पण या कारणामुळे शेअर केला आहे की, जेव्हा कधी बॉलिवूड सिनेमा पाहायचे मनात येईल तेव्हा हा चेहरा लक्षात ठेवा.’ या व्हिडीओमध्ये त्याने सुशांतची बहिण, त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्यासह अनेकांना टॅग केले आहे. (हे वाचा- ‘क्षितीज प्रसादबरोबर कोणताही गैरव्यवहार नाही’, NCB ने सर्व आरोप फेटाळले ) अंकिताने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिने असे लिहले आहे की, ‘तुम्हाला काय झाले आहे? असे व्हिडीओ शेअर करणं बंद करा. तुम्हाला विनंती करते की त्वरित हा व्हिडीओ डिलीट करा. मला माहिती आहे की तुमचे त्याच्यावर प्रेम आहे, पण पाठिंबा देण्याची ही पद्धत नव्हे. मी हात जो़डून विनंती करते हा व्हिडीओ डिलीट करा.’
What’s wrong with u .stop posting such videos they are very disturbing for all of us .its a request to remove this video rite now .. we know u love him but this isn’t the way to show ur support or love to him 🙏🏻remove this video rite now !! https://t.co/1BjVy9SCDe
— Ankita lokhande Jain (@anky1912) September 29, 2020
दरम्यान अंकिताने हा व्हिडीओ रिट्वीट करत त्यावर खडे बोल सुनावले असल्याने तिच्यावर काही युजरनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करण्याची काय गरज होती असा सवाल तिला विचारण्यात येतो आहे. (हे वाचा- SSR Death Case : ‘CBI आणि एम्स एकमेकांशी सहमत मात्र आणखी चर्चेची आवश्यकता’) सुशांतचा मृतदेह 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात सापडला होता. त्याच्या अंतिम संस्कारांमवेळी अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित नव्हती. ती सुशांतला अशा परिस्थिती पाहू शकत नसल्याने ती उपस्थित नसल्याचे तिने सांगितले होते.