मुंबई, 29 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ कितपत खरे असतात हे सांगणं कठीण असतं. दरम्यान कोरिओग्राफर आणि ‘इंडियाज बेस्ट डांसर’ (India’s Best Dancer) या शोचे परिक्षक टेरेन्स लुईस (Terence Lewis) ला देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप टेरेन्सवर करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत नोराने टेरेन्सला पाठिंबा दिला आहे. तरी देखील अनेक युजर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करणे थांबवले नाही आहे. मात्र याबाबत कोणतीही थेट प्रतिक्रिया न देता टेरेन्सने एका कहणीच्या माध्यमातून त्याचे मत मांडले आहे. ही कहाणी शेअर करताना त्याने नोरा फतेहीबरोबरचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये टेरेन्सने म्हटले आहे की, ‘एकदा एक बौद्ध धर्मगुरू त्यांच्या शिष्यांबरोबर त्यांच्या हिमालयातील मठामध्ये चालले होते. त्यांच्या मठाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये त्यांना आवेशात वाहणाऱ्या गंगा नदीचे पात्र देखील पार करायचे होते. त्याठिकाणी नदीपात्राजवळ एक महिला चिंतेत बसलेली असते. तिला त्या नदीपलिकडे असणाऱ्या तिच्या गावात जायचे होते. तिला एकटीने नदी पार करण्यास भीती वाटत होती त्यामुळे तिने त्या सन्याशांना मदतीसाठी विचारले. (हे वाचा- सुशांतच्या अंत्यसंस्काराचा VIDEO पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली… ) त्या बौद्ध धर्मगुरूंनी तिला होकार दिला आणि तिला उचलून घेतले. त्यांनी तिला नदी पार करण्यास मदत केली आणि त्यानंतर तिला खाली उतरवले. धर्मगुरूंचे आभार मानून ती तिच्या घरी निघून गेली. हे सर्व पाहून एक तरुण शिष्य अस्थीर झाला होता, तो चिंतेत पडला होता. अनेक तासांच्या प्रवासानंतर ते सर्वजण मठामध्ये पोहोचले तरी देखील तो तरुण शिष्य चलबिचल होता. याचा अंदाज आल्याने धर्मगुरूंनी त्याला त्याचे कारण विचारले. (हे वाचा- ‘क्षितीज प्रसादबरोबर कोणताही गैरव्यवहार नाही’, NCB ने सर्व आरोप फेटाळले) त्यावर तो शिष्य म्हणाला, गुरुजी आपण स्त्रीला हात न लावण्याची शपथ घेतली आहे, पण तुम्ही तर तिला उचलून आणले. तुम्ही आम्हाला स्त्रियांचा विचार करू नका असे सांगता पण तुम्ही तिला स्पर्श केला.तेव्हा हसत धर्मगुरूंनी उत्तर दिले की, ‘मी तिला उचलून नदीपार आणले आणि खाली उतरवले. तू तिला अजूनही उलचलले आहेस का?
टेरेन्स या पोस्टमध्ये पुढे असं म्हणाला आहे की, ‘धन्यवाद नोरा, सर्वात सुसंस्कृत, प्रतिष्ठित आणि दर्जेजार पाहुणी परिक्षक बनण्यासाठी आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास दाखवण्यासाठी.‘टेरेन्सच्या या पोस्टनंतर त्याच्या आणि नोराच्या चाहत्यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.