JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / आता गोळी खाऊन घरबसल्या करा कोरोनावर उपचार; मृत्यूचा धोका 90 टक्क्यांनी होणार कमी, इथे Paxlovid ला मंजुरी

आता गोळी खाऊन घरबसल्या करा कोरोनावर उपचार; मृत्यूचा धोका 90 टक्क्यांनी होणार कमी, इथे Paxlovid ला मंजुरी

प्रयोगशाळेच्या डेटाद्वारे हे सिद्ध झाले आहे, की हे अँटी-व्हायरल औषध ओमायक्रॉनने संक्रमित लोकांमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 90 टक्क्यांनी कमी करेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 23 डिसेंबर : अमेरिकेत (America) फार्मा कंपनी फायझरच्या (Pfizer) कोरोनाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या (Covid anti viral drug) घरगुती वापरास मान्यता देण्यात आली आहे. यासह, होम कोविड उपचारांमध्ये (Home Covid Treatment) समाविष्ट केलेलं हे अमेरिकेतील पहिलं औषध ठरलं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) ही परवानगी दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जगभरात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. Pfizer ने दावा केला आहे की त्यांच्या अँटीव्हायरल औषधामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा धोका आणि कोरोना बाधितांच्या मृत्यूची शक्यता 89 टक्क्यांनी कमी होते. एक आठवड्यापूर्वी Pfizer ने दावा केला आहे की त्यांचं अँटीव्हायरल औषध Paxlovid हे Omicron प्रकाराविरूद्ध 90 टक्के प्रभावी आहे. कंपनीनं म्हटलं होतं की प्रयोगशाळेच्या डेटाद्वारे हे सिद्ध झाले आहे, की हे अँटी-व्हायरल औषध ओमायक्रॉनने संक्रमित लोकांमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 90 टक्क्यांनी कमी करेल. कसं रोखणार Omicron ला? प्रसिद्ध मार्केटमधील गर्दीचा काळजात धस्सं करणारा VIDEO गेल्या नोव्हेंबरमध्ये आपल्या या औषधाची घोषणा करताना फायझरनं सांगितलं की हे औषध रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी करतं. हे कोरोनाचं पहिले औषध म्हणूनही प्रसिद्ध झालं. अमेरिकेसह जगभरातील बहुतांश देशांमध्ये सध्या कोरोनाच्या उपचारासाठी फक्त इंजेक्शनचा वापर केला जात आहे. आणखी एक औषध निर्माता कंपनी मर्कनेही दावा केला आहे की कोविड-19 विरुद्ध त्यांनी तयार केलेले औषध धोकादायक ओमायक्रॉन प्रकारावरही प्रभावी ठरेल. मर्क कंपनीने कोविड-19 विरुद्ध अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीर (molnupiravir) विकसित केलं आहे. या औषधाला अद्याप यूएस नियामकांकडून मंजुरी मिळणं बाकी आहे. कोरोना लस घेतलेल्यांसाठी Good news; परिणाम पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकीत झाले मर्कला आशा आहे की त्यांचं हे औषध Omicron प्रकारावरदेखील प्रभावी ठरेल. त्यांना असा विश्वास आहे की जरी हे औषध ओमायक्रॉनच्या म्यूटेशनसाठी कारणीभूत असलेल्या प्रोटीनला लक्ष्य करत नसलं, तरीही ते ओमायक्रॉनच्या विरूद्ध प्रभावी असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या