मराठी बातम्या /बातम्या /देश /

कसं रोखणार Omicron ला? कडक निर्बंधांनंतर प्रसिद्ध मार्केटमधील गर्दीचा काळजात धस्स करणारा VIDEO

कसं रोखणार Omicron ला? कडक निर्बंधांनंतर प्रसिद्ध मार्केटमधील गर्दीचा काळजात धस्स करणारा VIDEO

ओमिक्रॉनची दहशत असताना आणि तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावत असताना प्रसिद्ध मार्केटमध्ये तोबा गर्दी दिसून आली आहे.

ओमिक्रॉनची दहशत असताना आणि तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावत असताना प्रसिद्ध मार्केटमध्ये तोबा गर्दी दिसून आली आहे.

ओमिक्रॉनची दहशत असताना आणि तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावत असताना प्रसिद्ध मार्केटमध्ये तोबा गर्दी दिसून आली आहे.

  • Published by:  Priya Lad
नवी दिल्ली, 22 डिसेंबर : देशात कोरोनाचा (Coronavirus)  नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron) प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढच्या वर्षी कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. असं असताना आता काळीज धस्स करणारा असा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. जेलोक अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले आहेत (Crowd in Delhi market for x-mas shopping). ख्रिसमस आणि न्यू इअरमध्ये कोरोना वाढण्याचा धोका घेता लोकांना कोरोना गाईडलाईन्सचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो आहे. मास्क घालून घराबाहेर पडा, सोशल डिस्टन्सिंग राखा अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. असं असताना जणू कोरोना आता नाहीच असं समजून लोकांनी सर्व नियम पायदळीच तुडवले आहेत. हे च दाखवणारा हा भयंकर असा व्हिडीओ आहे. ख्रिसमस, न्यू इअरच्या निमित्ताने लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंग सोडाच लोक एकमेकांवर चढूनच शॉपिंग करत आहेत. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील (Delhi) सरोजनी नगर मार्केटमधील (Sarojini Nagar Market)  हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता कपड्यांची दुकानं आहेत आणि लोक एकावर एक असे मार्केटमध्ये घुसताना दिसत आहेत. इतकी गर्दी पाहून तर आपल्यालाही धडकी भरते. ओमिक्रॉनला चिरडून चिरडून मारण्याची तयारी असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत दिसणारी इतकी गर्दी पाहून सर्वांनाच भीती वाटू लागली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. देशभरात रात्रीची संचारबंदी? भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे (Omicron Cases in India) झपाट्याने वाढत आहेत. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या तर  दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता दिल्लीत ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही राज्यातील हे असं चित्र म्हणजे चिंताजनकच आहेत. हे वाचा -  Omicron चं निदान करण्याची सर्वात सोपी पद्धत; 90% रुग्णांमध्ये दिसली अशी लक्षणं त्यामुळे केंद्र सरकारने (Central Government on Spread of Omicron) राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी (Night Curfew) कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना वॉर रूम सक्रिय करण्यास सांगितलं आहे. तिसरी लाट निश्चित व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीनं म्हटलं आहे की, देशात दररोज सुमारे 7500 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र ओमायक्रॉनमुळे हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे. हे वाचा - Corona vaccine घेतलेल्यांसाठी मोठी Good news; असा परिणाम पाहून शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकित झाले समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे 2022 च्या सुरुवातीस देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्रभावी ठरेल. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, कोरोनाची तिसरी लाट पुढील वर्षी लवकर येण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Coronavirus, Viral, Viral videos

पुढील बातम्या