मुंबई, 22 डिसेंबर : संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा
(coronavirus) सामना करत आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनाचा प्रसार ओसरत असल्याचे चित्र दिसून येत होते. परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली होती. पण पुन्हा कोरोना विषाणूचे
(Coronavirus New Variant) नवीन प्रकारसमोर आल्याने खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉनसारख्या
(Omicron) व्हेरिएंटने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. या व्हेरिएंटने तर आता लशीबाबत पुन्हा प्रश्नचिन्हं उपस्थित करायला भाग पाडलं. या सर्व परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या (Coronavirus Positive) लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचे एका अभ्यासातून समोर आलं आहे. या लोकांमध्ये 'सुपर इम्युनिटी' आढळली आहे.
अमेरिकेमधील ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमधील एका ग्रुपने केलेल्या संशोधनातून (Covid Vaccine Super Immunity Research) हे उघड झालं आहे. हे परिणाम पाहून शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. 26 लोकांवर चाचणी करण्यात आली. यातून असे दिसून आले की, लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये 2000 टक्क्यांपेक्षा जास्त अँटीबॉडीज वाढल्या आहेत. लस घेण्यापूर्वी या लोकांना कोरोनाची लागण एकदाही झालेली नव्हती. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. या 26 रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमधील मॉलिक्युलर बायोलॉजीचे प्राध्यापक फिकाडू ताफेसे यांनी सांगितले.
हे वाचा -मोठी बातमी: लस घेतलेल्या 90% भारतीयांना Omicron चा धोका- संशोधन
प्राध्यापक फिकाडू ताफेसे यांनी डेली मेलशी बोलताना या वाढलेल्या अँटीबॉडीच्या प्रमाणाचा 'सुपर इम्युनिटी' (Super Immunity ) असा उल्लेख केला. जगभरात कोरोनाचा ओमायक्रॉनचा प्रसार झाल्यानंतर हा अहवाल समोर आला आहे. ओमायक्रॉनवर (Omicron variant ) कोरोनालसीचा (Covid Vaccine) परिणाम कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
जगभरातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाला आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये या विषाणूची जास्त रुग्ण आढळली आहेत. सध्याच्या या परिस्थितीमध्ये या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनची लागण होत असल्याचे दिसून आले आहे.
हे वाचा - Omicron चं निदान करण्याची सर्वात सोपी पद्धत; 90 टक्के रुग्णांमध्ये दिसली अशी लक्षणं
फायझर (Pfizer) किंवा मॉडर्ना (Moderna) कडून बूस्टर शॉट घेतलेल्या लोकांमध्ये सामान्य विषाणूच्या तुलनेत ओमायक्रॉनविरोधात लढण्यासाठी 6.5 पट कमी अँटीबॉडीज आहेत. म्हणजे ओमायक्रॉनला रोखण्यासाठी बूस्टर शॉटदेखील पर्याप्त नसल्याचे कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. आहार आणि जीवनशैलीत बदल करावा, ताजी फळे आणि भाज्या खाव्यात, व्यायाम किंवा योगा करावा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. तसेच लक्षणे दिसताच निष्काळजीपणा करू नये. तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. ही काळजी घेतल्यास तुम्ही कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.