कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहकुटुंब लस घेतली आहे.मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आह. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे.