मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: खरी मैत्री; भुकेल्या बकरीच्या मदतीला धावून आला कुत्रा, बाटलीनं पाजलं दूध

VIDEO: खरी मैत्री; भुकेल्या बकरीच्या मदतीला धावून आला कुत्रा, बाटलीनं पाजलं दूध

एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर (Twitter) व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला (Viral Video of Goat and Dog) बाटलीनं दूध पाजताना दिसत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 जुलै: सोशल मीडियावर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यातील बरेच व्हिडिओ तर असे असतात जे पाहून अनेकांचा दिवसच खास जातो. याच कारणामुळे सोशल मीडियावर असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर (Twitter) व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला (Viral Video of Goat and Dog) बाटलीनं दूध पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. याच कारणामुळे इंटरनेटवर (Internet) या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

लग्नमंडपातच नवरी-नवरदेवाचा तो अवतार पाहून पाहुणे थक्क; जबरदस्त VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला बाटलीनं दूख पाजत आहे. हा व्हिडिओ @buitengebieden नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये यूजरनं गुड बाय असंही लिहिलं आहे. जीआयएफ फॉरमॅटमध्ये असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे एक कुत्रा बकरीला बाटलीनं दूध पाजत आहे. या व्हिडिओची आणखी एक खास गोष्ट म्हणजेच ही बकरीदेखील अगदी आरामात बाटलीनं दूध पित आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लगेचच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ खरंच खूप खास आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की असे व्हिडिओ पाहून कोणाचाही दिवस चांगला जाईल. आणखी एका यूजरनं लिहिलं, की अशी दृश्य फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे, लोकांसमोर येताच हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

लग्नमंडपात अचानक पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न

हा व्हिडिओ 3 जुलैला ट्विटवर शेअर केला गेला आहे. तेव्हापासूनच या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. याशिवाय अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे.

First published:

Tags: Dog, Friendship, Goat, Social media viral, Twitter, Video viral, Wild animal