मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नमंडपात अचानक झाली पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न

लग्नमंडपात अचानक झाली पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न

एका लग्नसमारंभातील हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. अचानक लग्नमंडपात पोलिसांची (Police) एन्ट्री झाली.

एका लग्नसमारंभातील हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. अचानक लग्नमंडपात पोलिसांची (Police) एन्ट्री झाली.

एका लग्नसमारंभातील हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. अचानक लग्नमंडपात पोलिसांची (Police) एन्ट्री झाली.

लखनऊ 04 जुलै : सध्या लग्नाचा सीझनच सुरू आहे. त्यामुळे, या लग्नसमारंभात (Marriage Function) घडणाऱ्या अनेक घटना समोर येत असतात. आता अशाच एका लग्नसमारंभातील हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. अचानक लग्नमंडपात पोलिसांची (Police) एन्ट्री झाली. पोलीस थेट नवरदेव-नवरीजवळ (Bride Groom) पोहोचले, त्यांना केवळ एक प्रश्न विचारला आणि यानंतर हे लग्न थांबवण्यात आलं. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात शनिवारी घडली आहे.

कसं होणार शिक्षणं? Online क्लाससमोरचं विद्यार्थ्याने केलं सेक्स

एका माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, एका अज्ञात व्यक्तीनं मुख्यमंत्री पोर्टलवर केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात एका व्यक्तीनं सांगितलं होतं, की नोएडाच्या एका गावात दोन मुलं आणि दोन मुलींचा विवाह होणार आहे. हे सर्व सोबतच शिक्षण घेतात. लवकर या. ही माहिती मिळताच पोलीस आणि चाइल्ड हेल्पलाइनचे लोक लगेचच याठिकाणी दाखल झाले. .यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान अधिकाऱ्यांनी नवरदेव आणि नवऱ्यांना त्यांचं वय विचारलं. चौघांचंही वय 14 वर्षाच्या आसपास असल्याचा खुलासा यात झाला.

कुटुंबाने लेकीला झाडाला लटकवून जनावरासारखं मारलं; घटनेचा धक्कादायक VIDEO

ग्रेटर नोएडा प्रोबेशन अधिकाऱ्यांनी सांगितलं, की पोलिसांच्या टीमनं या चौघांसोबत बातचीत केल्यानंतर त्यांच्या वयाशी संबंधित कागदपत्रंही तपासले. यातून चारही अल्पवयीन असल्याचा खुलासा झाला. यानंतर टीमनं हा विवाह तात्काळ थांबवला. भविष्यात असं कृत्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी या चौघांच्याही कुटुंबीयांना सांगितलं आहे.

First published:

Tags: Child marriage, Crime, Marriage, Wedding