नवी दिल्ली 04 जून : सोशल मीडियावर (Social Media) बऱ्याचदा लग्नसमारंभातील मजेशीर व्हिडिओ (Funny Marriage Video) व्हायरल होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. काही व्हिडिओ तर इतके विचित्र (Weird Video) असतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात नवरदेव आणि नवरी (Groom and Bride) एका गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत.
लग्नमंडपात अचानक पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न
लग्नसमारंभात सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र नवरदेव आणि नवरीच असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. लग्नसमारंभादरम्यान डान्स आणि गाण्यांच्या कार्यक्रमानं वातावरण आणखीच प्रसन्न वाटतं. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील आपल्याच लग्नात डान्स (Bride Dance Video) करताना दिसतात. सध्या एका नवरीचा असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यात ती सपना चौधरीच्या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे.
देखिए दूल्हा-दुल्हन का डांस pic.twitter.com/w6enTam5Jp
— @tweetbyjounralist (@kumarayush084) July 3, 2021
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव आणि नवरीबाई हरियाणवी सिंगर सपना चौधरीच्या प्रसिद्ध ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की हे दोघंही मोठ्या आनंदात आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत.
कुटुंबाने लेकीला झाडाला लटकवून जनावरासारखं मारलं; घटनेचा धक्कादायक VIDEO
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. अनेक यूजर्सनं यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं आहे, की हे दृश्य खरच खूप सुंदर आहे. बहुतेक 36 च्या 36 गुण मिळले आहेत. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की असा मजेदार डान्स मी आजपर्यंत पाहिला नाही. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनं नवरदेव आणि नवरीचं कमेंट करत कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Video viral, Wedding