निखिल अग्रवाल, प्रतिनिधी मेरठ, 29 जून : घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर आपल्याला त्याचा लळा लागतो हे अगदी स्वाभाविक आहे. त्याला जरा दुखापत झाली किंवा तो डोळ्यासमोरून काहीवेळ दिसेनासा झाला की आपला जीव कासावीस होतो. परंतु मेरठमध्ये या प्राणीप्रेमाची जरा हद्दच झाली. येथील आयुक्तांचा पाळीव कुत्रा हरवला म्हणून आयुक्तांनी त्याबाबत रीतसर तक्रार दाखल न करताच सफाई कर्मचाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत सर्वांना कामाला लावलं. कुत्र्यासाठी खास शोधमोहीम राबवण्यात आली. ही बातमी पसरल्यावर सर्वसामान्य लोकांनी अक्षरशः हात जोडले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या आयुक्त निवासातून सायबेरियन हस्की जातीचा कुत्रा हरवला. इको नामक हा कुत्रा आयुक्त सेल्वा कुमारी यांचा प्रचंड लाडका होता. तीन वर्षांपासून तो कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांच्यासोबत राहत होता. त्यांच्या मुलीलाही त्याचा लळा होता. त्यामुळे कुत्रा हरवल्याचं कळताच आयुक्तांच्या घरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. पोलिसांत तक्रार दाखल न करताच त्यांनी पोलिसांना कुत्र्यासाठी शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले. रस्त्यावरील सफाई कर्मचाऱ्यांनाही कुत्रा शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आजूबाजूच्या सर्व घरांमध्ये चौकशी करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर अखेर कुत्रा सापडला, तेव्हा कुठे आयुक्तांच्या जीवात जीव आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे, आयुक्त निवासाचा गेट एक गाडी आत येण्यासाठी उघडण्यात आला होता. तेव्हा संधी पाहून पांढऱ्या काळ्या रंगाचा हा कुत्रा गेटबाहेर धावत सुटला. एका वाटसरूने त्याला पाहिलं आणि आपल्यासोबत नेलं. काही दिवसांनी आयुक्तांचा सायबेरियन हस्की जातीचा कुत्रा हरवल्याची बातमी कळताच या व्यक्तीने स्वतः इकोला आयुक्त निवासात पोहोचवलं. ‘सुहागरात’नंतर सकाळीच बाळ; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीच्या GOOD NEWS मुळे सासरचे शॉक दरम्यान, सायबेरियन हस्की हा विदेशी जातीचा कुत्रा अतिशय महागडा असतो. इतर कुत्र्यांच्या तुलनेत त्याची किंमत जास्त असते. शिवाय त्याच्या देखभालीसाठीही अव्वाच्या सव्वा खर्च होतो.