जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'सुहागरात'नंतर सकाळीच बाळ; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीच्या GOOD NEWS मुळे सासरचे शॉक

'सुहागरात'नंतर सकाळीच बाळ; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीच्या GOOD NEWS मुळे सासरचे शॉक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

लग्नानंतर नवरी लगेच प्रेग्नंट झाली आणि बाळालाही जन्म दिल्याने सासरच्यांना मोठा धक्का बसला.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 29 जून : लग्नानंतर काही महिन्यांनीच, काय मग आता गूड न्यूज कधी? असा प्रश्न नवदाम्प्त्याला विचारला जातो. पण अशी गूड न्यूज एका नवरीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दिली आहे. लग्न झालं, लग्नाच्या रात्री हनीमून झालं आणि याच्या दुसऱ्या दिवशी नवरीने बाळाला जन्म दिला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने दिलेल्या गूड न्यूजमुळे सासरच्यांना मात्र जबर धक्का बसला. उत्तर प्रदेश मधील ही विचित्र प्रकरण आहे. ‘चट मंगनी पट बियाह’ असं तुम्ही ऐकलं आहे. पण या प्रकरणात मात्र ‘चट बियाह पट बच्चा’ असं दिसून आलं आहे. लग्न, हनीमून आणि लगेच नवरी प्रेग्नंट होऊन बाळही जन्माला आलं आहे. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहुयात.

News18लोकमत
News18लोकमत

ग्रेटर नोएडात राहणाऱ्या तरुणाचं लग्न सिकंदराबादमधील एका तरुणीशी झालं. नवरीला वाजतगाजत सासरी आणण्यात आलं. मूल नको म्हणता म्हणता जाईल तुमचाच जीव; वयाच्या पंचविशीतच तरुणीची भयानक अवस्था हनीमूनच्या दिवशीच नवरीच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. तेव्हा सासरचे घाबरले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिथं तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या. तेव्हा जे सत्य समजलं त्यामुळे सासरच्यांना मोठा धक्का बसला.  नवरीबाई चक्क प्रेग्नंट होती. त्यातही धक्कादायक म्हणजे दुसऱ्याच दिवशी नवरीने एका बाळाला जन्म दिला. तेव्हा तर सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हे सात महिन्यांचं बाळ होतं. वधूपक्षाने आपली फसवणूक केल्याचा आरोप वरपक्षाने केला आहे. तरुणीचं पोट फुगलेलं दिसत होतं. त्याबाबत विचारलं असता तिच्या घरच्यांनी तरुणाच्या घरच्यांना तिचं किडनीचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे थोडं पोट फुगलं आहे, अस सांगितलं.  यानंतर वरपक्षाने वधूपक्षाला बोलावलं आणि नवरीला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. तेव्हा नवरीचे माहेरचे तिच्यासह बाळाला घेऊन घरी गेले. अजब प्रकरण! पुरुष झाला प्रेग्नंट; तब्बल 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर दिला जुळ्यांना जन्म आज तकच्या वृत्ता नुसार या प्रकरणी वरपक्षाने वधूपक्षाविरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात