जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घरी सुखरुप जाता यावं यासाठी तरुणानं GPS ची मदत घेतली, पण Map नं त्याला मृत्युच्या रस्त्यावर नेलं

घरी सुखरुप जाता यावं यासाठी तरुणानं GPS ची मदत घेतली, पण Map नं त्याला मृत्युच्या रस्त्यावर नेलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

खरंतर जीपीएस मॅप खरंच एक चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे लोकांना प्रवासात मदत होते, पण कितीही झालं तरी टॅक्नोलॉजीच ती, त्यामुळे कधी-कधी त्यामध्ये एरर देखील येऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 9 ऑक्टोबर : आजच्या जगात आपण टॅक्नोलॉजीवर इतकं अवलंबून राहातो की, त्याच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याचा विचार देखील करत नाही. तसेच आपण आपल्या स्वत:च्या मेंदूला देखील त्रास देणं कमी केलं आहे, ज्यामध्ये मग कॅलक्युलेटरचा वापर करणे असू देत, लवकर किंवा वेळेवर उठणं असू देत किंवा मग कोणतीही गोष्ठ लक्षात ठेवणं असू देत. आपण सगळ्याच गोष्टीसाठी टॅक्नोलॉजीवर अवलंबून आहे. आता जीपीएस मॅप आल्यानंतर तर बरेच लोक त्याच्या साह्याने जग फिरतात. खरंतर जीपीएस मॅप खरंच एक चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे लोकांना प्रवासात मदत होते, पण कितीही झालं तरी टॅक्नोलॉजीच ती, त्यामुळे कधी-कधी त्यामध्ये एरर देखील येऊ शकतात, हे आपल्याला माहित असायला हवं. हे वाचा : विमान प्रवासात मोबाइल फोन फ्लाइट मोडवर का ठेवावा लागतो? ज्यामुळे प्रवासासाठी जीपीएस मॅपवरती पूर्णपणे भरोसा न करता, नेहमी आपले डोळे, कान उघडे ठेवणे आणि इतरांना विचारुन पुढे जाणे केव्हा ही चांगले. कारण जर तसं झालं नाही, तर आपल्यासोबत काय होऊ शकतं याचा आपण विचार देखील करु शकत नाही. खरंतर जीपीएस मॅपमुळे प्रवाशांची फसवणूक झाली असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्या चर्चेचा विषय देखील ठरल्या आहेत. आता देखील जीपीएस मॅपमुळे एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वास्तविक, ही घटना अमेरिकेच्या कॅरोलिनाची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिलिप पॅक्सन नावाचा एक व्यक्ती गेल्या आठवड्यात येथील हिकोरी शहरात वाढदिवसाच्या पार्टीतून घरी परतत होता. यावेळी घरी येताना त्याने जीपीएस मॅपची मदत घेतली. पण त्याला या मॅपने चुकीच्या मार्गावर आणले आणि अंधारामुळे त्याचा घात झाला. हे वाचा : ते 5 लोक, जे आजही संपूर्ण जगासाठी रहस्य; कोण होते, कुठून आले? काहीच माहिती नाही आपली कार चुकीच्या पुलावरून जात आहे हे त्या व्यक्तीला माहीत नव्हते आणि तिने जीपीएस नकाशाच्या मार्गाने गाडी त्या पुलावर वळवली. कार त्यावर चढताच ती खाली पडली, ज्यामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की नेव्हिगेशन सिस्टमने त्या व्यक्तीला ज्या पुलाकडे जाण्याचा मार्ग दाखवला, जो नदीकडे जात होता. परंतू तो पुल तुटला होता, हे नेव्हिगेशला माहिती नव्हते, ज्यामुळे या व्यक्तीचा अपघात झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात