जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / विमान प्रवासात मोबाइल फोन फ्लाइट मोडवर का ठेवावा लागतो?

विमान प्रवासात मोबाइल फोन फ्लाइट मोडवर का ठेवावा लागतो?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

फ्लाइट मोड हा असा पर्याय आहे,ज्यामुळे तुम्ही काही वेळ नेटवर्कपासून दूर राहता. म्हणजेच, तुमचा फोन स्विच ऑफ होत नाही; पण स्विच ऑफ असल्यासारखाच असतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    विमान प्रवासात नेहमीच मोबाइल बंद करायला किंवा फ्लाइट मोडवर ठेवण्यास सांगितलं जातं. काही जण सूचनांचं पालन करून फोन बंद करतात; पण फोन बंद का करायला सांगितला जातोय हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण मोबाइल वापरावर काही अंशी बंधनं येतात. अर्थात, कामानिमित्त नियमित विमान प्रवास करणार्‍यांना हा प्रश्न पडत नाही. तरीही अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच. फ्लाइट मोडबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ या. फ्लाइट मोड हा असा पर्याय आहे,ज्यामुळे तुम्ही काही वेळ नेटवर्कपासून दूर राहता. म्हणजेच, तुमचा फोन स्विच ऑफ होत नाही; पण स्विच ऑफ असल्यासारखाच असतो. फोन स्विच ऑफ केला तर फोनमधलं काहीच वापरता येत नाही; मात्र फ्लाइट मोड चालू केला तर मात्र ती गैरसोय होत नाही. फ्लाइट मोडचा पर्याय ऑन केल्यावर सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी बंद पडते. इंटरनेट चालत नाही. इतकंच नाही तर तुम्हाला फोन येऊ शकत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. फ्लाइट मोड किंवा एअरप्लेन मोड ऑन केल्यावर तुम्ही फोनमधली लोकल अ‍ॅप्लिकेशन्स, व्हिडिओ, म्युझिक आणि इतर गोष्टींचा वापर करू शकता. तसंच काही डिवाइसमध्ये वाय-फाय आणि ब्लू-टूथचाही वापर फ्लाइट मोडमध्ये करणं शक्य असतं. ( एखाद्या व्यक्तीनं व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं आहे की नाही, हे कसं शोधाल? ) फोन फ्लाइट मोडवर ठेवण्यामागचं महत्त्वाचं कारण विमान प्रवास करताना फोन फ्लाइट मोडवर ठेवणं गरजेचं असतं. तसं न केल्यास मोबाइल फोनचा सिग्नल विमानाच्या संपर्क यंत्रणेमध्ये बाधा आणू शकतो. यामुळे पायलटला संपर्क साधताना अनेक अडचणींन तोंड द्यावं लागू शकतं. विमानाने उड्डाण केल्यापासून विमान पुन्हा जमिनीवर उतरेपर्यंत पायलट सातत्याने कंट्रोल रूमच्या संपर्कात असतो. प्रवाशांचे मोबाइल फ्लाइट मोडवर नसतील तर त्यांचे सिग्नल्स पायलटच्या कंट्रोल रूमशी असलेल्या नेटवर्कमध्ये अडथळा आणू शकतात. त्यामुळे संपर्क साधणं अवघड होऊन बसू शकतं. कारण त्यामुळे रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये अडथळा येतो. या कारणास्तव विमान प्रवासात मोबाइल फोन फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. मोबाइल फोन ही आता अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. अनेकांची दैनंदिन कामं मोबाइलवरच पार पडतात. अनेकदा मोबाइलमधल्या काही विशिष्ट ऑप्शन्सकडे दुर्लक्ष केलं जातं; पण हे पर्याय योग्य वेळी आपली भूमिका चोख बजावतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात