Home /News /viral /

अनोखी मैत्री! चिप्स चोरण्यासाठी चक्क कुत्र्यानं केली माकडाची मदत; VIDEO पाहून व्हाल अचंबित

अनोखी मैत्री! चिप्स चोरण्यासाठी चक्क कुत्र्यानं केली माकडाची मदत; VIDEO पाहून व्हाल अचंबित

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात कुत्रा आणि माकड मिळून एका दुकानात चोरी करत असल्याचं दिसतं (Monkey Stealing Chips from Shop)

  नवी दिल्ली 21 डिसेंबर : कुत्रे आणि माकडं यांच्यात सुरू असलेलं टोळीयुद्ध (Dog and Monkey Gang War) सध्या चांगलंच चर्चेत आहे. यामुळे ट्विटरवर MonkeyVsDog हा हॅश्टॅगही चांगलाच ट्रेंड झाला आहे. माकड आणि कुत्र्यांच्या या गँगवॉरवरुन लोक सोशल मीडियावर अतिशय विनोदी मीम्स शेअर करत आहेत. तर अनेकजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. मात्र यासर्वादरम्यान माकड आणि कुत्र्याचा एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Monkey and Dog) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणीनं जीव मुठीत घेऊन ठोकली धूम, VIDEO अनेकदा आपण सर्वांनी ऐकलं असेल की मैत्री कधीही रंग, रूप किंवा जात पाहून केली जात नाही. ती आपोआपच होत असते. याच कारणामुळे या नात्याला पवित्र मानलं जातं. प्रेम आणि विश्वासावरच हे नातं अवलंबून असतं. आजपर्यंत तुम्ही मैत्रीच्या अनेक कथा ऐकल्या असतील. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात कुत्रा आणि माकड मिळून एका दुकानात चोरी करत असल्याचं दिसतं (Monkey Stealing Chips from Shop).
  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की माकड अगदी मजेत आपल्या मित्राच्या म्हणजेच कुत्र्याच्या पाठीवर बसलं आहे (Friendship of Dog and Monkey). हा कुत्रा माकडाला पान टपरीजवळ घेऊन जातो. इथे जात दोघंही चिप्सचं पॅकेट चोरण्याचा प्लॅन करतात. यासाठी माकड कुत्र्याच्या पाठीवर उभा राहून चिप्स चोरण्याचा प्रयत्न करतं. मात्र पहिल्या प्रयत्नात ते अपयशी ठरतं आणि खाली कोसळतं. यानंतर पुन्हा हे माकड कुत्र्याच्या पाठीवर चढून चिप्स चोरण्याचा प्रयत्न करतं. तिथेच उपस्थित एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रस्त्याच्या मधोमध येत 3 सिंहांनी अडवला पर्यटकांचा रस्ता अन्..; पाहा Viral Video हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर naughty.raa नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 10 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी ही अतिशय खास मैत्री असल्याचं म्हणत व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, या दोघांची मैत्री पाहून मला माझ्या लहानपणीच्या मित्राची आठवण आली. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, या मैत्रीला सलाम. आणखी एकाने लिहिलं, या व्हिडिओला partner in crime असं कॅप्शन द्यायला हवं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dog, Friendship, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या